Wednesday, July 3, 2024

करीनाने लग्नाबद्दल शेअर केले तिचे विचार; म्हणाली, ‘अभिनेत्रीसाठी सर्वात मोठा टॅबू…’

करीना कपूर ही बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने चित्रपटसृष्टीला ‘3 इडियट्स‘, ‘बजरंगी भाईजान‘, ‘जब वी मेट‘ असे अनेक दमदार चित्रपट दिले. सध्या ती तिच्या आगामी ‘द क्रू‘ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तब्बू आणि क्रिती सेनॉन दिसणार आहेत. अशात एका मुलाखतीदरम्यान तिने आपल्या लग्नाविषयी सांगितले. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

करीना कपूर (kareena kapoor) हिने 2012मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केले. लग्नाच्या चार वर्षानंतर, करीनाने तिचा पहिला मुलगा तैमूर अली खानला जन्म दिला, तर 2021मध्ये अभिनेत्रीने लहान मुलगा जहांगीर अली खान याचे स्वागत केले.

मुलाखतीदरम्यान करीनाला विचारण्यात आले की, बॉलीवूडमध्ये वयाबाबत बदल झाला आहे का? यावर करीना म्हणाली, “होय, मला असे वाटते. तुम्हाला तुमच्या वयाचा अभिमान असायला हवा. आजच्या महिला धाडसी झाल्या आहेत. स्त्री अभिनेत्रीसाठी सर्वात मोठा टॅबू म्हणजे लग्न करणे हाेते. मात्र, आता तुमच्या वैवाहिक जीवनाचा तुमच्या करिअरवर परिणाम होत नाही. चित्रपट निर्माते आता अनेक जोखीम पत्करून वेगवेगळ्या लोकांना संधी देत ​​ऑफबीट स्क्रिप्टवर काम करत आहेत.”

करीना वर्किंग मदरबद्दल बाेलताना म्हणाली, “वर्क लाईफ बॅलन्स मिळवण्यासाठी कोणतेही फॉर्म्युला आहे असे मला वाटत नाही, त्यात कोणतेही रहस्य नाही. तुम्ही काय करायचे काय नाही हा तुमचा निर्णय आहे. मी ज्या गाेष्टी करण्यास इच्छित नाही त्या गाेष्टी मी करत नाही. कारण, मला माझ्या मुलांना एकटे सोडायचे नाही. मी माझ्या निवडीबद्दल स्पष्ट आहे. कारण, मी माझ्या पतीसोबत घरी बसून शो पाहणे किंवा एक ग्लास वाइन पिणे पसंत करेन. वर्क लाईफ बॅलन्स तयार करणे हे माझ्यावर अवलंबून आहे.”

करीना कपूरच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर ती ओटीटीवर ‘सस्पेक्ट एक्स’च्या माध्यमातून दिसणार आहे. हा चित्रपट सुजॉय घोष यांनी दिग्दर्शित केला असून, याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.(bollywood actress kareena kapoor talk about married life actress said marriage is just taboo and will not affect your career )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नापतोल व्हर्जन ऑफ कंगना’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड असणाऱ्या सबा आझादला ट्रोल

शालेय दिवसांमध्ये श्रद्धा करायची परिक्षेत चीटिंग? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

हे देखील वाचा