Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

हॅंडशेक करण्यासाठी आलेल्या लेडी फॅनसाेबत करीना कपूरने केले असे ‘कृत्य’, अभिनेत्रीची वागणूक पाहून चाहते थक्क

करीना कपूर खान ही चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे चाहते जगभरात आहेत, जे तिच्या एका भेटीसाठी तळमळत असतात. यासाेबत अभिनेत्रीचे चाहते सोशल मीडियावर देखील तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओचे कौतुक करतात. अभिनेत्रीने वयाचा 40पेक्षा जास्ट टप्पा गाठला असता तरी ती प्रत्येक स्टाईमध्ये सुंदर दिसते. चाहत्यांना तिची आणि सैफ अली खानची जाेडी देखील चांगलीच आवडते. अशात अलीकडेच अभिनेत्री सैफ अली खानसाेबत डिनर डेटसाठी बाहेर गेली हाेती, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. काय आहे प्रकरण? चला जाणून घेऊया…

खरे तर, अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoo) डिनर डेटसाठी घटनास्थळी पाेहचताच कारमधून उतरल्यानंतर एका लेडी फॅनने तिच्याशी हॅंडशेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान अभिनेत्रीने त्या लेडी फॅनला हॅंडशेक न करता नमस्कार करून तेथून निघून गेली. करिनाच्या या एटीट्यूडने काही साेशल मीडियाल युजर्स अभिनेत्रीला ट्राेल करत आहेत, तर काही अभिनेत्रीची बाजू घेत आपले मत मांडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अभिनेत्रीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘लाल सिंह चढ्ढा’मध्ये दिसली होती. मात्र, अभिनेत्रीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लाॅप झाला. असे असेल तरी करीनाला तिच्या दमदार अभिनयासाठी बेस्ट एक्ट्रेसच्या श्रेणीतील फिल्मफेअर अवॉर्डसाठी नॉमिनेट केल्या गेले आहे.

करीना कपूरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच ‘द क्रू’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. राजेश कृष्णन दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर व्यतिरिक्त  तब्बू, क्रिती सेनन आणि दिलजीत दोसांझ यांच्या मुख्य भूमिका आहेत.(bollywood actress kareena kapoor waves at lady fan who wants to touch her hand)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चिंतेमुळे 125 किलो वाढलं वजन अन् श्वास घेण्यास हाेत हाेता त्रास; पारस छाबराचा माेठा खुलासा, म्हणाला…
‘या’ चित्रपट निर्मात्यानं सलमान अन् आमिरवर केला माेठा आराेप; म्हणाला, ‘या दोघांमुळे माझा चित्रपट… ‘

हे देखील वाचा