बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांची ऑनस्क्रीन जोडी तसेच त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. बऱ्याच काळानंतर 2021मध्ये दोघेही पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसले होते. सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या ‘बंटी और बबली 2‘ चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. हे दोन्ही कलाकार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत असताना एकमेकांबद्दल अनेक खुलासे करत होते. यावेळी सैफ अली खानने राणी मुखर्जीच्या किसवर प्रतिक्रिया दिली होती. बुधवारी (दि. 16 ऑगस्ट) सैफने 53वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्या किसविषयीच्या प्रतिक्रियेविषयी जाणून घेऊयात…
सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांच्या 2004 मध्ये आलेल्या ‘हम तुम’ या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट होता. सैफ आणि राणी यांनीही ‘हम तुम’ या चित्रपटात अनेक रोमँटिक सीन्स दिले होते. या चित्रपटात दोघांचा एक किसिंग सीन (Kissing Scene) देखील आहे, ज्याला सैफने आता सिनेमाच्या इतिहासातील सर्वात वाईट किस म्हटले आहे.
यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर सैफ आणि राणी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांसोबत काम करतानाचे अनुभव शेअर करताना दिसत आहेत. पहिल्यांदाच एकत्र काम करण्याबद्दल बोलताना सैफ आणि राणी यांना त्यांचा ‘हम तुम’ चित्रपट आठवला. या चित्रपटाबद्दल बोलताना त्याने चित्रपटाच्या किसिंगबद्दलही सांगितले.
व्हिडिओमध्ये राणी मुखर्जी म्हणते की, “तुला आठवतंय की, किसिंग सीन करताना आपण किती घाबरलो होतो.” तिच्या या प्रश्नावर सैफ म्हणतो, “होय, मला आठवतंय की, किसिंग सीन शूट करताना मी किती घाबरलो होतो. मी सेटवर पोहोचलो आणि त्या दिवशी तू माझ्याशी खूप चांगले वागलीस. तू माझी तब्येत, माझा प्रवास आणि इतर गोष्टींबद्दल विचारत होतीस.” यावर राणीने त्याला लोकांना सांगण्यास सांगितले की, “त्यावेळी तुला मला किस करायची नव्हती.”
सैफ पुढे म्हणाला की, “मी हे सांगू शकत नाही, माझ्या बॉसने मला सांगितले म्हणून मी तसे केले. तू खूप घाबरली होतीस, पण काही वेळाने तू होकार दिलास.”
सैफने व्हिडिओमधील चित्रीकरणादरम्यान राणीच्या चेहऱ्यावरील हास्याची नक्कल केली आणि “हे खूप अस्वस्थ होते आणि सिनेमाच्या इतिहासातील ही सर्वात वाईट किस होती” असे म्हटले. अभिनेत्री राणीही त्याच्या या मुद्द्यावर सहमत दर्शवलेली. (bunty aur babli 2 actor saif ali khan reveal he was being uncomfortable during kissing shot with rani mukerji for film hum tum)
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा चित्रपटाच्या सेटवर स्टंट करताना सैफला पडले होते 100 पेक्षा जास्त टाके, प्रीती झिंटाने दिलेली साथ
Made In Heaven 2: राधिकाच्या दलित महिलेच्या भूमिकेबद्दल प्रकाश आंबेडकरांचे भाष्य; ट्वीट करत म्हणाले…