बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आज म्हणजेच शुक्रवार (दि. 10 डिसेंबर)ला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. सकाळपासूनच त्यांचे चाहते दोघांच्या पोस्टची वाट पाहत होते. अशातच आता सर्वांची प्रतीक्षा संपली असून या सेलिब्रिटी कपलने एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. कॅटरिना आणि विकीने त्यांच्या सोशल अकाऊंटवर काही फोटो शेअर करून त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे.
अभिनेत्री कॅटरिना (katrina kaif) आणि विकी (vicky kaushal) याने त्यांच्या लग्नाच्या फोटोंसोबत त्यांचे काही वैयक्तिक क्षण शेअर केले आहेत. दोघांनीही एकमेकांसाठी लव्ह नोट्स लिहिल्या आहेत. फोटो शेअर करताना कॅटरिनाने लिहिले की, “माझ्या प्रकाशाचा किरण, एक वर्षाच्या शुभेच्छा…” ज्यासोबत तिने हार्ट इमोजीही शेअर केले आहे. गेल्या वर्षी 9 डिसेंबर 2021 रोजी दाेघेही सवाईमाधोपूर येथे लग्न बंधनात अडकले हाेते.
View this post on Instagram
विकीने फोटोंच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त केले आहे. विकीने लिहिले आहे की, “वेळ पटकन निघून गेला… पण तो जादूने तुझ्यासोबत घालवला. आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन. मी तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करतो.
View this post on Instagram
कॅटरिनाने विकीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आनंदाने नाचताना दिसत आहे आणि बॅकग्राउंड कॅटरिनाचे हसणे ऐकू येत आहे.
कॅटरिनाच्या कारकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर कॅटरिनाने तिच्या अभिनय कारकिर्दीत ‘बँग बँग’, ‘बूम’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ ‘टायगर जिंदा है’, ‘धूम 3’, ‘एक था टायगर’, ‘बार बार देखो’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.(bollywood actress katrina kaif and actor vicky kaushal shares photos on their 1st wedding anniversary)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! पठान चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं ‘या’ दिवशी हाेणार रिलीज
बॉलिवूडचा दबंग खान पुन्हा प्रेमात! ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीला करतोय डेट