Thursday, April 18, 2024

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! पठान चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं ‘या’ दिवशी हाेणार रिलीज

शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या प्रमोशनची प्राेसेस सुरू झाली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाबाबत मोठ्या प्रमाणावर नियोजन केले आहे जेणेकरून चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत प्रेक्षकांमध्ये उत्साह भरला जाईल. पोस्टर्स, टीझरनंतर आता चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज होणार आहे. शाहरुख खानने त्याच्या सोशल अकाऊंटवर दीपिका पदुकोण हिचे पोस्टर शेअर केले आहे. त्यानुसार ‘पठाण’चे पहिले गाणे ‘बेशरम रंग’ 12 डिसेंबरला रिलीज होत आहे.

या चित्रपटात दीपिका पदुकोण (deepika padukone) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील तिचा लूकही खूप वेगळा असेल. रिलीज झालेल्या नवीन पोस्टरमध्ये दीपिका गोल्ड कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. तिचा किलर लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे आणि असे मानले जातं आहे की, हे गाणे रिलीज होताच चार्टबस्टर्समध्ये स्थान मिळवेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

पोस्टर शेअर करताना शाहरुखने लिहिले, “बेशरम रंग या गाण्याची वेळ आली आहे… गाणे 12 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता रिलीज होत आहे.” त्याने असेही लिहिले की, “जवळच्या सिनेमागृहांमध्ये ‘पठाण’द्वारे YRF ची 50 वर्षे एंजॉय करा. ‘पठाण’ 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यावरील चित्रपटाचे ‘करंट’ हे गाणे आजकाल हिट होत आहे. दीपिकाने हे गाणे खास ‘सर्कस’ चित्रपटासाठी केले आहे. तर दुसरीकडे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ही जोडी पुन्हा एकदा ‘पठाण’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अशा परिस्थितीत चाहते दोघांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ( pathaan movie first song besharam rang release on december 12th bollywood actor shahrukh khan deepika padukone john abraham film)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मोठा माणूस लहाण मुलीला डेट करत असेल तर तो प्लेयर आणि जर…’, मलायकाचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘या’ सवयीने हैराण झालेल्या शशी कपूर यांनी रागाच्या भरात शॉटगन यांना केली होती मारहाण

हे देखील वाचा