कॅटरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते वेडे आहेत. कतरिनाचे नाव अशा अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. गेले बरेच दिवस कॅटरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे. जेव्हा आलिया आणि रणबीर कपूरने पालक होण्याची घोषणा जाहीर केली तेव्हापासून कॅटरिना आणि विकीदेखील लवकरच पालक होणार अशी चर्चा सुरु होती. आता पुन्हा एकदा एका व्हिडिओवरुन अशा चर्चांना उधाण आलं आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कॅटरिना कैफ (Katrina Kaif) एअरपोर्टवर दिसत आहे. कॅटरिनाने यावेळी भगव्या रंगाची जॉगर्स आणि पांढऱ्या रंगाचं लाँन्ग स्लिव्ह्स टी-शर्ट घातलं आहे. याच बरोबर हा लूक पुर्ण करण्यासाठी तिने पोनी बांधली आहे. तसंच डोळ्यांवर गॉगल्स घातले आहेत.कॅटरिना कैफ तिच्या स्टायलिश स्टाइलसोबतच तिच्या कम्फर्टकडेही विशेष लक्ष देते. सध्या कॅटचा लेटेस्ट एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. या लूकमध्ये साध्या आउटफिट्समध्येही कतरिना खूपच स्टायलिश दिसत आहे. याशिवाय, कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन, अभिनेत्रीने काळ्या रंगाचा मुखवटा देखील परिधान केला आहे. या लूकमध्ये कतरिना खूपच स्टायलिश आणि स्टनिंग दिसत आहे.तिचा हा लूक पाहताच चाहते असा अंदाज बांधू लागले आहेत की, कतरिना लवकरच गुडन्यूज देऊ शकते.
View this post on Instagram
कॅटरिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते ती प्रेग्नंट असल्याचं म्हणत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत एका चाहत्याने लिहीलंय की, हा बेबी बंप आहे का? तर दुसऱ्या एका युजर्सने लिहीलंय की, कतरिना खूप क्यूट मम्मी होईल. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, ही नक्कीच प्रेग्नंट आहे. तर अजून एका चाहत्याने कमेंट करत सांगितलं आहे की, ती त्यापैकी एक आहे जी सगळ्यात फिट आणि फ्लॅट टम्मी मम्मी आहे. अशा अनेक प्रकारच्या कमेंट अभिनेत्रीच्या व्हिडिओ वर येत आहेत. पण या सगळ्या चर्चांनंतरही यावर कतरिना कैफने काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे आता प्रेक्षक आता हे कपल कधी गुडन्यूज देतात यावर लक्ष ठेवून आहेत.
‘टायगर ३’मध्ये ती सलमान खानसोबत दिसणार आहे. तिचा ‘फोन भूत’ देखील इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या रांगेत आहे. याशिवाय कॅटरिना श्रीराम राघवनच्या ‘मेरी ख्रिसमस’ आणि फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
व्हायरल व्हिडिओनंतर करणसिंग ग्रोवर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; म्हणाले, ‘तो बायकोच्या जिवावर जगतो…’
बाहुबलीचे लेखक काढणार ‘आरएसएस’वर वेबसिरीज; घोषणा करत म्हणाले, ‘RSS ने गांधींना…’