अभिनेत्री कॅटरिना कैफचे सोशल मीडिया अकाउंट हॅक? नावही बदलले

कॅटरिना कैफ (Katrina Kaif) ही हिंदी चित्रपट जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. परंतु नुकतेच अभिनेत्रीचे अकाउंट हॅक झाल्याची चर्चा सिने जगतात रंगली आहे. काय आहे यामागील सत्य, चला जाणून घेऊ.

कॅटरिना कैफला सोशल मीडियावर 66 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात आणि तिचे प्रत्येक पोस्ट येताच चाहते एकामागून एक कमेंट करताना दिसतात. आज, अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील प्रोफाईल नाव बदलल्याने कॅटरिनाच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हे पाहून चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली, त्यानंतर यूजर्सनी लगेच स्क्रीन शॉट्स शेअर करायला सुरुवात केली आणि कॅटरिना कैफचे इन्स्टा अकाउंट हॅक झाल्याची चर्चा झाली.

कॅटरिना कैफने आज स्वतःचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती रंगीबेरंगी फुलांच्या पोशाखात दिसली होती. यासोबतच कतरिनाने कॅप्शनमध्ये असे संकेतही दिले होते की, ती किंग खानची पत्नी गौरी खानसोबत नवीन घोषणा करू शकते. यादरम्यान कॅटरिनाच्या अकाउंटममध्ये काही बदल दिसले, ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

कॅटरिना कैफच्या प्रोफाईलवर तिचं नाव दिसतं पण काही काळापासून तिथे ‘कॅमेडिया मॉडरेट्स’ असे दिसत होते. चाहत्यांना वाटले की कॅटरिनाचे खाते हॅक झाले आहे, जरी माहिती समोर आली की अभिनेत्रीने स्वतः प्रोफाइलचे नाव बदलले आहे, जे तिने स्वतः काही काळानंतर दुरुस्त केले.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कॅटरिना कैफ लवकरच ‘फोन भूत’ या कॉमेडी हॉरर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती टायगर 3 मध्येही दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्याविरुद्ध अभिनेता सलमान दिसणार आहे.

हेही वाचा –

बाबो! रणवीर सिंग पुन्हा करणार न्यूड फोटोशूट, ‘या’ खास मोहिमेसाठी करण्यात आली विनंती

‘म्हणून मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जात नाही’, अभिनेता आमिर खानने पहिल्यांदाच केला खुलासा

‘या’ एका व्यक्तीने घोळ घातला नसता तर; मन्नतचा मालक सलमान खान असता, खुद्द भाईजानने केला खुलासा

Latest Post