Thursday, June 26, 2025
Home बॉलीवूड कॅटरिना प्रेग्नेंसीमुळे नाही तर, ‘या’ कारणास्तव आहे मीडियापासून दुर, जाणून घ्या सत्य

कॅटरिना प्रेग्नेंसीमुळे नाही तर, ‘या’ कारणास्तव आहे मीडियापासून दुर, जाणून घ्या सत्य

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कॅफ बऱ्याच दिवसांपासून पडद्यावर दिसलेली नाही. ही अभिनेत्री शेवटची ‘फोन भूत‘ या चित्रपटात दिसली होती. यासोबतच कॅटरिनाने लग्नानंतर पब्लिक अपीरियंसमध्ये येणे देखील कमी केले आहे, त्यामुळे तिचे चाहते तिला सोशल मीडियावर सतत अनेक प्रश्न विचारत आहेत.

कॅटरिना कॅफ (katrina kaif ) अलीकडेच ईदच्या मुहूर्तावर आयुष शर्मा आणि अर्पिता खानच्या घरी दिसली होती, ज्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवा पसरू लागल्या हाेत्या. यासोबतच असे म्हटले जात होते की, प्रेग्नेंसीमुळे अभिनेत्रीने सार्वजनिक ठिकाणी येणं कमी केलं आहे.

मात्र, या केवळ अफवा आहेत. कॅटरिना प्रेग्नेंसी किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे नव्हे, तर तिच्या व्यावसायिक जीवनामुळे सार्वजनिक ठिकाणी कमी येत आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, कॅटरिना तिचा आगामी चित्रपट ‘टायगर 3’मध्ये खूप व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेत्री पुन्हा एकदा सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

चित्रपटामुळे, कॅटरिनाने सार्वजनिक ठिकाणी कमी येण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून प्रेक्षकांना चित्रपटामधील तिच्या भूमिकेबद्दल उत्सुकता राहील. अभिनेत्री ‘टायगर 3’ साठी खूप मेहनत घेत आहे, जेणेकरून ती तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करू शकेल. कॅटरिना शेवटची ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसली होती. मात्र, तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर  प्रेक्षकांना फारसा प्रभावित करू शकला नाही.

मंडळी,’पठाण’ नंतर शाहरुख खान आणि सलमान खान पुन्हा एकदा ‘टायगर 3’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. किंग खान 8 मे रोजी ‘टायगर-3’च्या शूटिंगसाठी टीममध्ये सामील होऊ शकतो. शाहरुख आणि सलमानचे चाहते त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.(bollywood actress katrina kaif low profile after her marriage vicky kaushal because of tiger 3 not for pregnancy reports)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लाल रंगाच्या साडीत पाहायला मिळाली चंद्राच्या सौंदर्याची जादू, फाेटाे व्हायरल

हौसेला मोल नाही आणि फॅशनला तोड नाही! घटस्फोट झाल्यानंतर चक्क ‘या’ अभिनेत्रीने केले डिवोर्स फोटोशूट

हे देखील वाचा