बॉलिवूडमधील 80 ते 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे किमी काटकर. त्या काळात ती तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाने खूप लोकप्रिय होती. चित्रपटसृष्टीत चांगले यश मिळाल्यानंतर अचानक तिने चित्रपटात काम करणे सोडून दिले आहे. ती आता चित्रपटसृष्टीपासून खूप लांब आहे. ती तिच्या परिवारासोबत तिचे आयुष्य एन्जॉय करत आहे. तिने काही दिवसांपूर्वी तिचे सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. त्या फोटोमध्ये तिला ओळखणे अवघड होते.
किमीने 1985 साली ‘पत्थर दिल’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने 1991 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘हम’ या चित्रपटात काम केले. त्यांचा हा चित्रपट खूप सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील ‘जुम्मा चुम्मा’ हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटानंतर ती ‘जुम्मा चुम्मा गर्ल’ या नावाने प्रसिद्ध झाली होती. यानंतर ती ‘ऍडवेंचर ऑफ टार्झन’ या चित्रपटात बोल्ड सीन दिल्यामुळे खूप चर्चेत होती.
किमीने बॉलिवूडमध्ये जेवढे चित्रपट केले आहेत त्यातील अनेक चित्रपट तिने सुपरहिट कलाकारांसोबत काम केले आहे. परंतु त्यानंतरही ती चित्रपटसृष्टीपासून लांब झाली. माध्यमातील वृत्तानुसार, इंडस्ट्रीमध्ये हिरोपेक्षा हिरोईनला कमी महत्व देत असल्याचे तिला अजिबात आवडत नव्हते. तिला हा भेदभाव आवडत नसल्याने ती चित्रपटसृष्टीपासून लांब गेली. चित्रपटसृष्टीपासून लांब गेल्यानंतर तिने शांतनू गौरीसोबत लग्न केले. तो एक फोटोग्राफर आणि जाहिरात निर्माता म्हणून ओळखला जातो. त्या दोघांना एक मुलगा आहे. ते त्यांचे आयुष्य मजेत जगत आहेत.
किमीने मॉडेलिंगमधून चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले होते. तिने वयाच्या 17 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिने अनेक सुपरहिट अभिनेत्यांसोबत काम केले आहे. यात तिची आणि गोविंदाची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…