Wednesday, March 29, 2023

‘या’ गोष्टीला मिस करतेय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित; फोटो शेअर करत म्हणाली, ‘परत…’

राज्यात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती आहे. काही ठिकाणी अनलॉक करण्यात येत आहे, तर चित्रपटसृष्टी अद्याप ठप्प आहे. चित्रपटाचे शूटिंग थांबलेले आहे, तर काही चित्रपटाच्या रिलीझ तारखादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशामध्ये मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित शूटिंगसोबतच तिच्या व्हॅनिटी व्हॅनला मिस करत आहे.

तेजस्विनीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यात तिने लाल रंगाची नववारी साडी नेसली आहे. तर कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ अन् दागिने घालून नटल्याने तेजस्विनीचे रूप अगदी खुलले आहे. एकंदरित शूटसाठी केलेला हा लूक, चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. शिवाय अभिनेत्री यात व्हॅनिटी व्हॅनमध्ये उभी राहून, सेल्फी क्लीक करताना दिसली आहे.

हा फोटो शेअर करत, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तर मला पुन्हा व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊ वाटतंय. मेकअप रूम क्लिक.” यावरून तेजस्विनी तिच्या कामाला किती मिस करत आहे, हे सहज लक्षात येऊ शकते. फोटोवर कमेंट करून, चाहते तिच्या सुंदरतेचे कौतुक करत आहेत. याशिवाय अभिनेत्री शिवानी बावकरने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवानी कमेंट करत म्हणाली, “अति सुंदर.”

तेजस्विनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने केदार शिंदे दिग्दर्शित, ‘अग्गं बाई अरेच्चा’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. एका वास्तविक कथेवर आधारित, मी ‘सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटाने तिला बरीच ओळख मिळवून दिली. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तिने फक्त चित्रपटातच नव्हे, तर टीव्ही शो आणि नाटकांमध्येही काम केले आहे. तेजस्विनी अखेरच्या वेळेस संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत उमेश कामत आणि सिध्दार्थ जाधव मुख्य भूमिकेत दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा