Saturday, June 14, 2025
Home बॉलीवूड आदिपुरुष’च्या ट्रेलर लाँचवेळी भावूक झाली क्रिती सेनाॅन; म्हणाली, ‘काही चुका झाल्या असतील, तर…’

आदिपुरुष’च्या ट्रेलर लाँचवेळी भावूक झाली क्रिती सेनाॅन; म्हणाली, ‘काही चुका झाल्या असतील, तर…’

बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष‘ चित्रपटाचा दमदार ट्रेलर काल म्हणजेच मंगळवारी(दि. 9 मे)ला मुंबईत लाँच करण्यात आला. अशात या ट्रेलरला चाहत्यांची खूप पसंती मिळत असून लाखो लोकांनी ताे यूट्यूबवर पाहिला आहे. ट्रेलर लाँचच्या वेळी प्रभास, क्रिती सेनॉन, दिग्दर्शक ओम राऊत, निर्माता भूषण कुमार यांच्यासह मनोज मुंतशीर उपस्थित होते. मात्र, यादरम्यान क्रिती खूप भावूक झाली. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

‘आदिपुरुष’च्या ट्रेलर लाँचवेळी क्रिती सेनाॅन बोलताना भावूक झाली. ‘जय श्री राम’च्या घोषणेने तिने भाषणाला सुरुवात केली. यासोबत ती म्हणाली, “आज मी खूप भावूक होत आहे. अनेकवेळा मी ट्रेलर लाँचसाठी आले आहे, पण आज मी खूप भावूक होत आहे. ट्रेलर पाहताना माझ्या अंगावर काटा आला हाेता, ही एक भावनात्मक भावना होती.” कारण, हा चित्रपट फक्त एक चित्रपट नाही, तर तो आपल्या सर्वांसाठी खूप काही आहे. हा चित्रपट बनवताना ते आम्ही सर्वांनी अनुभवले.”

“सर्वप्रथम, मी ओम राऊत यांचे आभार मानू इच्छितो की, तुम्ही मला जानकीची भूमिका करण्यास सक्षम मानले. तुमचा माझ्यावर विश्वास होता की, मी जानकीची भूमिका करू शकते. कारण, अशी भूमिका साकारण्याची संधी फार कमी कलाकाराना मिळते. अशा परिस्थितीत मला खूप धन्य वाटत आहे.” क्रिती पुढे म्हणाली, “मी ही भूमिका मनापासून, पूर्ण श्रद्धा आणि आदराने साकारण्याचा प्रयत्न केला आहे. जानकीचे पात्र माझ्यासाठी अतिशय धार्मिक, उदार आत्म्याचे, प्रेमळ आणि कणखर व्यक्तिरेखेचे ​​संगम होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कृतीने या पात्राला 200 टक्के देण्याचा केला प्रयत्न केला
क्रिती पुढे म्हणाली, “माझ्या (नवीन) पोस्टरमध्ये वेदना, प्रतीक्षा, आठवणी आहेत, पण त्यात भीती नाही. कारण, माझा राघव येईल आणि त्या विश्वासाने अशोक वाटिकेत राहणे ही माझ्यासाठी खूप मोठी भावना होती, जी मी पूर्ण निष्ठेने आणि प्रेमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. माझे 200% देण्याचा प्रयत्न केला. बाकी ते देव आहे, आपण माणसं आहोत. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा.”

ट्रेलर लाँचच्या वेळी या चित्रपटात रामची भूमिका साकारणाऱ्या प्रभासने चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना रामची भूमिका दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. प्रभास म्हणाला की, “आम्ही हा चित्रपट खूप प्रेम आणि आदराने बनवला आहे आणि आशा आहे की, सर्वांना हा चित्रपट खूप आवडेल.” प्रभासने हे सांगताच कृती मध्ये म्हणाली, “प्रभास हा भगवान रामसारखा सरळ आणि साधा आहे. प्रभास साधेपणाने भरलेला आहे आणि तो जे काही बोलतो ते मनापासून सांगतो.”

या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा सैफ अली खान ‘आदिपुरुष’च्या ट्रेलर लॉन्चला उपस्थित नव्हता. अशात हा चित्रपट 16 जून रोजी देशभरात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.(bollywood actress kriti sanon became emotional at the trailer launch of adipurush starring prabhas saif ali khan releasing on 16th june)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐकावे ते नवलच! वयाच्या ७९ व्या वर्षी ‘हा’ अभिनेता सातव्यांदा झाला बाबा, स्वतःच केला खुलासा

आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणाऱ्या ‘या’ गायिकेचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन

हे देखील वाचा