Sunday, June 23, 2024

प्रभाससोबत डेटिंगच्या बातम्यांवर क्रितीने केला खुलासा, युजर्सला सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री साऊथ सुपरस्टार प्रभासला डेट करण्याच्या बातम्या साेशल मीडियावर वेगाने व्हायरल हाेत आहे. क्रितीचे नाव ‘आदिपुरुष‘ को-स्टार प्रभाससोबत जोडले जात आहे. याआधीही दोघांनी या वृत्तांचे खंडन केले असले तरी, या अफवा साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. आता पुन्हा एकदा क्रितीने प्रभाससोबतच्या डेटिंगच्या बातम्यांवर मौन तोडले आहे.

खरं तर, सध्या क्रिती सेनन (kriti sanon) तिच्या नवीन चित्रपट ‘शहजादा’चे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत क्रिती सेननने प्रभास आणि तिच्या अफेअरच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. क्रिती सेनन म्हणाली की, “लोकांची स्मरणशक्ती कमी असते. कारण, ज्या गोष्टींवर खूप चर्चा होते त्या एक ना एक दिवस संपतात. अशा अफवांवर प्रतिक्रिया देऊन, त्यांना अधिक हवा देऊन लोकांचे लक्ष वेधणे हाेईल.”

क्रिती सेननने या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. क्रिती म्हणाली की, “अशा बातम्यांवर प्रतिक्रिया दिल्याने गोष्टी आणखी वाईट होतील म्हणून मला अशा अफवांवर बोलणे आवडत नाही. होय, जेव्हा अशा गोष्टींमुळे माझ्या कुटुंबाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ लागतो आणि तेव्हा मला असे वाटते की, या अफवा मर्यादा ओलांडत आहेत, तेव्हा मला या विषयावर आपले मत द्यायला आवडेल.” तसेच, क्रितीने पुन्हा एकदा प्रभाससोबतच्या डेटिंगच्या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले आहे.

क्रिती सेननच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचं झालं, तर ती कार्तिक आर्यनसोबत ‘शेहजादा’ चित्रपटात दिसली आहे. यासोबतच ती आता साऊथचा सुपरस्टार प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. गेल्या वर्षी ‘आदिपुरुष’चा टीझरही रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाची तारिख काही कारणास्तव पुढे ढकलली असल्याने आता हा चित्रपट 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेत आहे.(bollywood actress kriti sanon shehzada actress breaks silence on rumors of dating adipurush actor prabhas )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शर्मिला यांचा हिंदी सिनेसृष्टीबद्दल माेठा दावा; म्हणाल्या, ‘अमिताभ बच्चनसाठी खास स्क्रिप्ट…’

ग्लॅमरस गर्लचा ग्लॅमरस लूक! फोटो पाहुन होतील घायाळ

हे देखील वाचा