Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड क्रिती अन् प्रभास मालदीवमध्ये करणार साखरपुडा? डेटिंगच्या अफवांमध्ये आलं मोठं अपडेट

क्रिती अन् प्रभास मालदीवमध्ये करणार साखरपुडा? डेटिंगच्या अफवांमध्ये आलं मोठं अपडेट

साऊथचा सुपरस्टार अभिनेता प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन यांच्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून अफवा पसरत आहेत की, दोघे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, याबाबत दोघांनीही कोणतीही पुष्टी केलेली नाही. माध्यमातील वृत्तानुसार, दोन्ही कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. अशात आता दोन्ही कलाकारांच्या एंगेजमेंटची बातमी समोर येत आहे.

तर झाले असे की, विदेशी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी प्रभास (prabhas) आणि क्रितीच्या ( kriti sanon) साखरपुड्याबद्दल एक ट्विट केले आहे. त्यांनी त्यात लिहिले आहे की, कृती सेनन आणि प्रभास पुढील महिन्यात मालदीवमध्ये एंगेजमेंट करणार आहेत, ज्याबद्दल ते खूप आनंदी आहे. मात्र, याबाबत काेणताही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच प्रभास आणि क्रितीने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. ही बातमी कळल्यानंतर दोन्ही अभिनेत्यांचे चाहते त्यांच्या अधिकृत पुष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कृती आणि प्रभासच्या नात्याच्या अफवा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा वरुण धवनने ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये एक मोठा इशारा दिला होता. वरुणने शोदरम्यान सांगितले होते की, ‘क्रितीचे नाव कोणाच्या तरी हृदयात आहे.’ यावर शोमध्ये उपस्थित असलेल्या करण जोहरने त्याला विचारले की, ‘तो कोण आहे?’ ज्यावर त्याने सांगितले की, ‘एक माणूस आहे जो मुंबईत नाही पण तो सध्या दीपिका पदुकोणसोबत शूटिंग करत आहे.’ त्यादरम्यान प्रभास दीपिकासोबत शूटिंगमध्ये व्यस्त होता.

मात्र, अभिनेत्री क्रिती सेननने या सर्व अफवांचे खंडन केले हाेते. वरुणच्या विधानाला उत्तर देताना तिने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, “कोणत्याही पोर्टलने माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्यापूर्वी – मला माझा बबल फोडू द्या.” अभिनेत्रीने लिहिले की, “या अफवा पूर्णपणे निराधार आहेत.”

क्रिती सेननबद्दल बाेलायचे झाले, तर ती सध्या तिचा आगामी चित्रपट आदिपुरुषमध्ये अभिनेता प्रभाससोबत दिसणार आहे.(bollywood actress kriti sanon prabhas rumoured of getting engaged in maldives next month)

हे देखील वाचा