Tuesday, April 16, 2024

‘प्रभाससमोर ऋतिक रोशन काहीच नाही’, राजामौलींच्या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीमध्ये खळबळ

भारतीय सिनेसृष्टीमधील ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक एसएस राजामौली हे कलाविश्वातील दर्जेदार चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा वेगळ्या दृष्टीकोनाने दिग्दर्शित केला जातो. त्यांची चित्रपट निर्मितीची पद्धत अनेक चाहत्यांना भुरळ घालते. एकदा त्यांनी प्रभासची तुलना बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता ऋतिक रोशन याच्या सोबत केली होती. ‘बाहुबली‘ समोर तो काहीच नाही असंही ते म्हणाले होते.

सिनेसृष्टीमधील प्रतिष्ठीत दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamauli) यांनी भारतीय चित्रपट विश्वामध्ये बाहुबली (Bahubali), आरआरआर, (RRR) सारखे गाजणारे चित्रपट दिले आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाचे बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक आणि निर्माता फॅन आहेत. नुकतंच सोशल मीडियावर एसएस राजामौली यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी अभिनेता ऋतिक रोशन (Hritik Roshan) याची तुलना बाहुबली स्टारर प्रभास (Prabhas) सोबत केली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राजामैली म्हणतात की, “जेव्हा ‘धूम 2‘ दोन वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता तेव्हा मला आश्चर्य वाटले की, फक्त बॉलिवूडच का असे गुणवत्तासारखे चित्रपट बनवत आहे. काय आमच्याकडे ऋतिक रोशनसारखे हिरो नाहीत? मी अत्ताच ‘बिल्ला‘ चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर पाहिला आहे आणि एकच गोष्ट म्हणू शकत आहे की, प्रभास समोर रितिक रोशन काहीच नाही. मी चित्रपट निर्माता मेहर रमेश यांनी तेलुगू चित्रपटांना हॉलिवूडच्या बरोबरीने घेऊन जाण्यासठी धन्यवाद देत आहे.”

राजामौली यंच्या व्हिडिओवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, “मी या गोष्टीबद्दल थोडं सहमत आहे, पण एसएस राजामौली यांनी हे सांगितलं मात्र, ही गोष्ट 15 वर्षापूर्वी आहे. तेव्हा कोणी तेलुगू चित्रपट नव्हते बघत. हे देखिल कधी कधी हवेतच बोलत असतात. त्यांनी श्रीदेवी सोबतही व्यवहार केला होता आणि आपल्या भावनांना नियंत्रित करु शकले नाहीत.”

दिग्दर्शकाने अधी बॉलिवूड चित्रपटांचे कौतुक केले आणि बहुबली आल्यानंतर त्यांना ऋतिकपेक्षाही चांगला प्रभासवाटू लागला. त्यांच्यामते प्रभाससमोर ऋतिक कहीच नाही. सांगायचे झाले तर राजामौलींचा हा खूप जुना व्हिडिओ आहे जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पेहराव नंगटपणा असेल तर मग अमृता फडणवीसला …’, सुषमाताई अंधारेंचा चित्रा वाघ यांना खोचक सवाल
…आशीर्वाद देणारे आहेत “पंत” प्रसाद ओकच्या नव्या सिनेमाची घोषणा, साकारणार ही मोठी भूमिका

हे देखील वाचा