Monday, July 1, 2024

भाडं फुटलं रे! अखेर क्रितीने तिच्या सीक्रेट बाॅयफ्रेंडचा केला खुलासा, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन सोशल मीडियावर नियमितपणे सक्रिय असलेल्या स्टार्सपैकी एक आहे. अभिनेत्री तिचे अपडेट्स चाहत्यांसोबत कायमच शेअर करत असते. आता अलीकडेच क्रिती पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडली गेली. यादरम्यान तिने आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दलही सांगितले.

क्रिती सेनन (kriti senon) हिने सोमवारी (दि. 27 फेब्रुवारी)ला इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सेशन घेलता. जिथे तिने चाहत्यांना काहीही विचारण्यास सांगितले. यादरम्यान चाहत्यांनी अभिनेत्रीला तिच्या ब्युटी टिप्सपासून तिच्या आगामी प्रोजेक्ट्सपर्यंत अनेक प्रश्न विचारले, परंतु बहुतेक प्रश्न अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारले गेले. बहुतेक चाहत्यांनी क्रितीच्या बॉयफ्रेंडचे नाव जाणून घेण्यात रस दाखवला.

क्रिती सॅनन गेल्या अनेक दिवसांपासून प्रभासला डेटिंग करण्याबाबत चर्चेत आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. आस्क मी एनीथिंगदरम्यान एका चाहत्याने क्रितीला तिच्या बॉयफ्रेंडचे नाव काय आहे असे विचारले. या प्रश्नाच्या उत्तरात क्रिती सेननने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती म्हणाली, “हे एक सीक्रेट आहे… माझ्यासाठी देखील.” उत्तर दिल्यानंतर क्रिती मोठ्याने हसायला लागली.

kriti senon
kriti senon

‘भेडिया’च्या प्रमोशनदरम्यान क्रिती सेनन आणि प्रभासच्या डेटिंगच्या अफवांना वेग आला होता. कारण, वरुण धवनने प्रमोशनदरम्यान क्रिती आणि प्रभासची नावे गंमतीने जोडली, ज्यानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्यांनी सोशल मीडियावर पेट घेतला. मात्र, क्रितीने लगेचच हा केवळ विनोद असल्याचे स्पष्ट केले.

क्रिती सेननच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच प्रभाससोबत ‘आदिपुरुष’मध्ये दिसणार आहे. याशिवाय क्रितीचा ‘शहजादा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासाेबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. मात्र, शेहजादा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.(bollywood actress kriti senon reveals boyfriend name amid dating rumours with prabhas during ask me session)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अचूक वेळ साधली’ पठाणच्या यशावर अरबाज खानने व्यक्त केले त्याचे मत, कथा एकदम साधी मात्र…

‘सातारचा सलमान’ या चित्रपटासाठी संपुर्ण गावाला दिला रंग; हेमंत ढोमेंनी सांगितला मजेदार किस्सा

हे देखील वाचा