हे भारीये! सोशल मीडिया ट्रेंडिंगवर पाहायला मिळाला ‘धकधक गर्ल’चा वेगळाच अंदाज, तुम्हीही व्हाल घायाळ


बॉलिवूडमधील ‘धकधक गर्ल’ अशी जिची ओळख आहे, ती म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित होय. ५४ व्या वर्षी देखील तिच्या हावभावाने आणि डान्सने ती अनेक तरुणांच्या हृदयाच्या ठोका चुकवते. या वयात देखील तिचे सौंदर्य तेवढेच तेजस्वी दिसते. तिच्या डान्स आणि अभिनयाने तिने ९० च्या दशकातही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे आणि अजूनही करते. माधुरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. अशातच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

माधुरीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, माधुरी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग फॉलो करताना दिसत आहे. तिने आयफोन स्क्रीनलॉक फिल्टर वापरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, आय फोन या मोबाईलचे स्क्रीनलॉक दिसत आहे. त्यात माधुरीचा फोटो आहे, असे वाटत आहे. मात्र, नंतर समजते की, तो व्हिडिओ आहे. यावेळी ती अचानक डोळा मारते. (Bollywood actress Madhuri Dixit share her video on social media)

या व्हिडिओमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. ती पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालून खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचे चाहते सातत्याने या व्हिडिओवर त्यांचे प्रेम दर्शवत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत १६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूडला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘दिल’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘देवदास’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांंचा समावेश आहे. सध्या ती ‘डान्स दीवाने’ या शोचे परीक्षण करत आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रणदीप हुड्डाने घडवले एक दोन नव्हे, तर तब्बल ६ वाघांचे दर्शन, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

-लाखात एक मामा! सोनू सूदने घातली भाचीची वेणी, म्हणाला, ‘ज्यांना घालायचीय, त्यांनी माझ्याकडे या’

-फोटोत आजीसोबत बसलेल्या चिमुकल्याला ओळखलं का? आहे आपल्या वडिलांसारखाच सुपरस्टार


Latest Post

error: Content is protected !!