लाखात एक मामा! सोनू सूदने घातली भाचीची वेणी, म्हणाला, ‘ज्यांना घालायचीय, त्यांनी माझ्याकडे या’


अभिनेता सोनू सूद हा केवळ गरिबांचा देवदूत नाही, तर तो फॅमिली मॅन आहे. जेव्हा सोनू अनोळखी लोकांसाठी इतकं काही करू शकतो, तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता की, त्याचं त्याच्या कुटुंबीयांवर किती प्रेम असेल. सोनूही त्याची झलक फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांना दाखवत असतो. सोनूने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याची भाची नायरूला शाळेसाठी तयार करताना दिसत आहे.

सोनू सूद दिसला भाचीची वेणी घालताना
या व्हिडिओमध्ये तो नायरूच्या केसांची वेणी बनवताना दिसत आहे आणि तो बोलतही आहे. सोनू म्हणाला की, “एक वेळ अशी होती की, जेव्हा आई आम्हाला शाळेत जाण्यासाठी तयार करायची, आता मी नायरूला तयार करत आहे. नायरू मी तुझी अशी जबरदस्त वेणी घातली आहे की, तुझी मॅडम म्हणेल की, काय डिझायनर वेणी बनवली आहे.” यानंतर तो नायरूला विचारतो की, “तू शाळेत काय बोलशील?,” तर ती म्हणते की, “मामाने वेणी घातली आहे असे मी म्हणेन, पण जर ती चांगली नसेल तर मॅडम मारतील.”

यानंतर सोनू म्हणतो की, “का मारतील, त्यांना सांग सोनू अंकलने घातली आहे. पुढे तो म्हणाला की, “इतकी परफेक्ट वेणी कोणीही घालू शकत नाही. कोणाला घालायची असेल, तर माझ्याकडे येऊन घालू शकता.” हा व्हिडिओ शेअर करत सोनूने लिहिले की, “या छोट्या गोष्टी किती आनंद देतात. हा छोटासा आनंद हाच खरा खजिना आहे.”

सोनू हा शेतीशी जोडलेला अभिनेता आहे आणि हे त्याच्या फोटोंमधून दिसून येते. तो कधी ट्रॅक्टर चालवताना, तर कधी शेणाजवळ बसून आरामात फोटो काढतो. तो फिटनेस फ्रीक देखील आहे, त्यामुळे त्याचे जिमचे फोटोही खूप व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फोटोत आजीसोबत बसलेल्या चिमुकल्याला ओळखलं का? आहे आपल्या वडिलांसारखाच सुपरस्टार

-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक

-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे


Latest Post

error: Content is protected !!