Monday, July 1, 2024

प्राणघातक अपघाताची आठवण काढत अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली ‘अजय- काजोल यांनी संपूर्ण इंडस्ट्रीपासून लपवली ही गोष्ट’

बॉलिवूड दिग्दर्शक संतोष घई यांच्या ‘परदेश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री महिमा चौधरी हिने तिच्या गोड हास्याने आणि निरागस चेहऱ्याने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती. आजही तिच्या सौंदर्याचे सगळे दिवाणे आहेत. पण 90 च्या दशकात घडलेल्या एका अपघाताने तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. आजही तो क्षण आठवला तरी तिला त्रास होतो. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत महिमाने भावुक होत तिच्या अपघाताबद्दल आणि अजय देवगण आणि काजोल यांच्याबाबत खुलासा केला आहे.

मुलाखतीत महिमाने सांगितले की, तिच्या सोबतचा हा अपघात ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी बंगळुरूमध्ये झाला होता. ती शूटिंगसाठी निघाली होती, तेव्हा एका दूध गाडीने तिच्या कारला धडक दिली, तेव्हा तिचा अपघात झाला होता. या अपघातात तिच्या चेहऱ्याला खूप जखमा झाल्या होत्या.

महिमाने सांगितले की, “गाडीची काच माझ्या चेहऱ्यावर एका गोळी सारखी शिरली होती.” या अपघातातून सावरताना तिने बॉलिवूडमध्ये काहीतरी वेगळे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारण त्यावेळी तिचा आत्मविश्वास पूर्ण खालावला होता. त्यावेळी तिला अजय देवगणने खूप मदत केली होती, तो या चित्रपटाचा निर्माता होता.

आपल्या या मुलाखतीत एका मॅगझिनबद्दल बोलताना महिमाने सांगितले की, ‘जेव्हा माझा अपघात झाला, तेव्हा मीडिया सेटवर आली होती. त्यांना माझ्याशी बोलायचे होते, पण मी काही बाहेर आले नाही.’ पुढे बोलताना ती म्हणाली, ‘त्यांनी लिहिले की, महिमाचा अपघात झाला आहे, आणि तिच्या चेहऱ्याला खूप जखमा झाल्या आहेत. आता आपण सगळे तिला ‘स्कार्स फेस’ असे म्हणू शकतो. या गोष्टीमुळे आजही त्रास होतो.’

महिमाचा अपघात झाला तेव्हा तिच्या सिनेमाचे निर्माते अजय देवगण आणि काजोल हे होते. तिने पुढे सांगितले की, ‘अजय देवगणने मला खूप मदत केली. माझ्या अपघाताबाबत कोणाला कळू नये म्हणून त्यांनी खूप काळजी घेतली. कारण त्यावेळेस ही गोष्ट जर कोणाला समजली असती, तर माझे करिअर संपुष्टात आले असते. मला चांगला उपचार मिळेल यासाठी त्याने पूर्ण प्रयत्न केले. मला बंगळुरूला न पाठवता त्याने उपचारासाठी पाठवले होते.’

महिमाने 1997 मध्ये ‘परदेश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर 2002 मध्ये तिने ‘दिल क्या करे’ या चित्रपटात काम केले होते. यानंतर तिने पुढे अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना विषाणूला गंभीरतेने न घेता जुहू बीचवर लोकांची गर्दी, अभिनेत्रीने ट्वीटमार्फत केली लॉकडाऊनची मागणी

-फक्त २५० रुपये होता ‘दयाबेन’चा पहिला पगार; रक्कम मिळताच ठेवली होती ‘या’ व्यक्तीच्या हातावर

-यो यो हनी सिंगने केला आई- वडिलांचा वाढदिवस साजरा, फोटोला मिळाले ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स

हे देखील वाचा