Thursday, September 28, 2023

फक्त 250 रुपये होता ‘दयाबेन’चा पहिला पगार; रक्कम मिळताच ठेवली होती ‘या’ व्यक्तीच्या हातावर

टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ मध्ये अशी अनेक पात्रे आहेत, जी प्रेक्षकांच्या मनावर बऱ्याच वर्षांपासून वर्चस्व गाजवत आली आहेत. ‘जेठालाल’ ची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांच्या अभिनयाचे कौतुक करणारे बरेच भेटतील. पण ‘दयाबेन’ म्हणून दिशा वकानीची स्तुती करणारेही काही कमी नाहीत. दिशा सध्या दयाबेनच्या भूमिकेत दिसत नाहीये. तरीही शोमध्ये आणि तिचे चाहते नेहमी तिचा उल्लेख करताना दिसतात.

का घेतलाय दिशाने ब्रेक?
गुजरातमधून आलेल्या दिशा वकानीच्या जीवनाविषयी बोलायचे झाले, तर तिने आई झाल्यानंतर ब्रेक घेतला होता. दिशा वकानी ही मूळची गुजरातची. तिचा जन्म 17 ऑगस्ट 1978रोजी अहमदाबाद येथे गुजराती जैन कुटुंबात झाला. तिने गुजरात कॉलेजमधून ड्रॅमॅटिकमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. दिशाने गुजराती थिएटरमधून रंगमंचावर अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने टीव्ही मालिकांमध्ये काम केले. दिशा वकानीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’पूर्वी ‘शुभ मंगल सावधान’, ‘खिचडी’, ‘झटपट खिचडी’, ‘हीरो भक्ती ही शक्ती है’ आणि ‘आहट’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती 2014 साली ‘सीआयडी’मध्येही दिसली होती.

दिशाचा पहिला पगार किती होता?
दिशाचे जीवन, संघर्षातून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची एक कथा आहे. कोईमोईच्या वृत्तानुसार, दिशा एका मुलाखतीत म्हणाली होती, “माझ्या आयुष्यातील पहिली कमाई 250 रुपये होती. मी एक नाटक केले होते, ज्यासाठी मला हे पैसे मिळाले होते. मी ते पैसे माझ्या वडिलांच्या हातावर ठेवले आणि हे पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. हे क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे क्षण होते. एखाद्या कलाकाराला यापेक्षा जास्त समाधान मिळूच शकत नाही.”

साल 2017 मध्ये आई झाल्यापासून, दिशा टीव्हीच्या जगातून गायब आहे. शोमध्ये तिचा उल्लेख नक्कीच येत असतो, परंतु ती अद्याप टीव्हीवर परतली नाही.

अधिक वाचा- 
‘हा माझा मार्ग एकला’ म्हणणाऱ्या सचिनजींनी 61 वर्षांच्या करिअरमध्ये तयार केली असंख्य नाती, आजही गाजवतायेत सिनेसृष्टी
‘कोंबडी पळाली’ या गाण्याने मिळाली खरी ओळख, असा होता मराठमोळ्या क्रांती रेडकरचा चित्रपट प्रवास

 

हे देखील वाचा