Tuesday, January 31, 2023

‘मला चुकिचं समजू नका…’, ऋतिक रोशनचं मिळणाऱ्या लोकप्रियतेबद्दल मोठं वक्तव्य

ऋतिक रोशनचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है‘ आजही त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करताे. ‘एक पल का जीना‘ या गाण्यातील त्याच्या अप्रतिम डान्सला चाहते अजूनही विसरू शकलेले नाही. ऋतिकमध्ये हिराेवाले सर्व गुण आहेत, तो ज्या चित्रपटात काम करतो त्या चित्रपटाच्या यशाची शक्यता जास्त प्रमाणात असते. ऋतिक रोशनलाही चांगले वाटते, जेव्हा लाेक त्याच्या अभिनय आणि चित्रपटाचे काैतूक करतात. मात्र, अशातच अभिनेत्यानं एका धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे ताे चांगलाच चर्चेत आला आहे.

ऋतिक रोशन (hrithik roshan) याने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काळाबरोबर जेव्हा ऋतिकचे स्टारडम वाढले तेव्हा सहाजिकच लोकांच्या अपेक्षाही वाढल्या. अशातच मुलाखतीदरम्यान ऋतिक त्याच्या स्टारडमबद्दल खुलेपणाने बोलला. अभिनेत्याने सांगितले की, ‘जेव्हा लोक त्याच्या अभिनयाची प्रशंसा करतात तेव्हा त्याला चांगले वाटते. त्याला सेक्यूर वाटतं, पण लोकांच्या त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, ते त्याला ओझं वाटतं.’

ऋतिक स्टारडमला एक जबाबदारी मानतो आणि त्याबद्दल आभर व्यक्त करत म्हणतो, “मला चुकिचं समजू नका. मला जे मिळत आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करताे. मात्र, मला हे भेटच्या स्वरुपात मिळलेलं एक ओझ आहे, ज्यात मी वाहून जात आहे. यासाठी मला कठाेर परिश्रम करावे लागतात.” अभिनेता आपाला मुद्द पुढे करत म्हणाला, ‘जेव्हा तुमच्याकडून कोणाच्याही अपेक्षा नसतात, तेव्हा तुम्ही निश्चिंत असता.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

जेव्हा ऋतिकला त्याचा आवडता चित्रपट कोणता असे विचारण्यात आले, तेव्हा त्याने ‘कोई मिल गया’ या चित्रपटाचे नाव घेतले. अभिनेत्याने नुकताच हा चित्रपट आपल्या मुलांना दाखवला. त्यावर अभिनेता म्हणाला, “मुलांच्या दृष्टिकोनातून जेव्हा मी हा चित्रपट समजून घेतला तेव्हा मला कळले की, मी कोणते चांगले काम केले आहे.”

ऋतिक राेशनच्या चित्रपटाबाबत बाेलायचे झाले, तर ताे लवकरच दीपिका पदुकोणसोबत ‘फाइटर’ या चित्रपटात दिसणार आहे. (bollywood actor hrithik roshan got stardom from first film kaho naa pyaar hai feel burden because of fans expectation said no one hopes then)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“डिप्रेशनशी लढण्यासाठी मला…”, हनी सिंगने शेअर केला मानसिक आजारपणातील अनुभव

मराठी अभिनेत्री भाग्यश्रीने हटके अंदाजात दिला 2022ला निरोप, पाहा फोटो

हे देखील वाचा