Monday, July 8, 2024

‘हिरो’सोबत दिसली मीनाक्षी शेषाद्री; व्यक्त केली पुनरागमनाची इच्छा

80 आणि 90 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिने मोठ्या पडद्यावर परतण्याची पूर्ण तयारी केली आहे. अभिनेत्रीनं 1995 मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश म्हैसूर यांच्याशी लग्न केले आणि लग्नानंतर सिनेसृष्टीला अलविदा करत अमेरिकेला गेली. मात्र, आता अभिनेत्री भारतात परतली असून तिने पुन्हा चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तर झाले असे की, रविवारी (दि. 5 नाेव्हेंबर)ला मीनाक्षी शेषाद्री (meenakshi seshadri ) जॅकी श्रॉफ (jackie shroff) यांच्यासोबत पुण्यातील एका कार्यक्रमात सहभागी झाली हाेती. मीनाक्षी शेषाद्रीने जॅकी श्रॉफसोबत ‘हीरो’ या चित्रपटातून पदार्पण केले. सुभाष घई दिग्दर्शित ‘हीरो’ बॉक्स ऑफिसवर एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आणि या चित्रपटानंतर मीनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफ यांनी ‘अल्लाह रखा’,’दहलीज’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. यांची जाेडी बाॅक्स ऑफिसवर चांगलीच हिट झाली. या कार्यक्रमादरम्यान अभिनेत्रीने जॅकी श्रॉफसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला आणि चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याबद्दलही सांगितले.

मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला चित्रपटांमध्ये परतायचे आहे. मला पुन्हा अभिनय करायचा आहे. काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखे वाटते. ओटीटीच्या आगमनाने बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्रींना चांगल्या संधी मिळत आहेत. विशेष म्हणजे त्यांना लक्षात घेऊनच कथा लिहिल्या जात आहेत.” अभिनेत्री पुढे सांगते की, “ती कोणत्याही प्रकारच्या भूमिकांमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. मी पूर्वी ज्या प्रकारचे काम केले आहे त्यावरुन मला वाटते की, मी कोणत्याही प्रकारची भूमिका करू शकते, त्यामुळे स्वत:ला कोणत्याही विशिष्ट प्रकार किंवा श्रेणीपुरते मर्यादित ठेवणे माझ्यासाठी चुकीचे ठरेल.”

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर हाेती, तेव्हा तिने इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश म्हैसूरशी लग्न केले. असे म्हटले जाते की, दोघांची पहिली भेट एका पार्टीत झाली होती, त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि 1995 मध्ये लग्न बंधनात अडकले. (bollywood actress meenakshi seshadri and actor jackie shroff were seen together after a long time she wants to comeback in films)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
जावेद अख्तरांचं ‘मुस्लीम पर्सनल लॉ’बाबत माेठं वक्तव्य; म्हणाले, “महिलांनाही एकापेक्षा जास्त पती…”
विश्वचषक सामना पाहण्यास कतारमध्ये पोहोचली अडल्ट स्टार, बोल्ड कपड्यांमुळे अटक?

हे देखील वाचा