Thursday, August 7, 2025
Home बॉलीवूड धक्कादायक! अभिनेत्री किरण खेर देत आहेत कर्करोगाशी झुंज; ट्वीट करत अनुपम खेर यांनी दिली माहिती

धक्कादायक! अभिनेत्री किरण खेर देत आहेत कर्करोगाशी झुंज; ट्वीट करत अनुपम खेर यांनी दिली माहिती

बॉलिवूड जगतातून पुन्हा एक दुःखद बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार किरण खेर, यांना रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले आहे. सध्या त्या मुंबईत आहेत आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरण खेर या चंदीगडमध्ये भाजपाच्या खासदार आहेत. ३१ मार्चला खासदार किरण खेर यांच्या अनुपस्थितीवरुन प्रश्न विचारले जात होते. काँग्रेसच्या या प्रश्नांची उत्तरे देत, प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी सांगितले की, किरण खेर यांना कर्करोग आहे. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

माध्यमातील वृत्तानुसार, सूद यांनी सांगितले की, “गेल्या वर्षी ११ नोव्हेंबर रोजी, चंडीगडच्या घरात किरण खेरच्या एका हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांची पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमआर) येथे एक मेडिकल टेस्ट करण्यात आली. या टेस्टनंतर त्यांना मल्टिपल मायलोमा असल्याचे निदान झाले. यामुळे त्यांना 4 डिसेंबरला उपचारासाठी मुंबईला जावे लागले.”

किरण खेर यांना मल्टिपल मायलोमा झाला आहे, जो रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. अभिनेत्रीवर मुंबईत उपचार सुरू आहेत. आता अनुपम खेर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अनुपम खेर यांनी लिहिले, “अफवा पसरवू नये म्हणून मी हे शेअर करत आहे. मला आणि सिकंदरला हे सांगायचे आहे की, किरण मल्टिपल मायलोमा नावाच्या रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत आणि आम्हाला खात्री आहे की, त्या पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनून यातून बाहेर येतील.”

एका लांब पोस्टमध्ये अनुपम खेर यांनी पुढे लिहिले की, “किरण यांच्या देखरेखीसाठी डॉक्टरांची एक चांगली टीम मिळवण्यासाठी आम्ही भाग्यवान आहोत. त्या नेहमीच फायटर राहिल्या आणि सतत लढल्या आहेत. किरण खेर जे काही करतात, ते मनापासून करतात. त्यांच्या मनात नेहमी प्रेम असते आणि म्हणूनच लोक त्यांच्यावर खूप प्रेम करतात. तुम्ही तुमच्या प्रार्थनांमध्ये किरणसाठी असेच प्रेम पाठवत राहा. त्या ठीक आहेत आणि रिकव्हर होत आहेत. तुमच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.” ही पोस्ट पाहिल्यानंतर, सोशल मीडियावर चाहते किरणच्या त्वरित रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहेत. यासह, अनुपम खेर यांना धैर्यही देत ​​आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बाथरूममध्ये तुम्हाला इतका वेळ का लागतो?’, युजरच्या विचित्र प्रश्नाला शाहरुख खानचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

-सोपा नव्हता ‘शिवाजीराव गायकवाड’ ते ‘सुपरस्टार रजनीकांत’पर्यंतचा प्रवास, एकेकाळी पोटासाठी कंडक्टरची नोकरी केलीये

-किम कर्दाश‍ियानची हॉटनेस पुन्हा एकदा चर्चेत! स्किन कलरच्या बिकिनी फोटोने केला सोशल मीडियावर राडा

हे देखील वाचा