साऊथ चित्रपट सृष्टीतील आपल्या हटके अंदाजाने आणि दमदार अभिनयाने प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारे अभिनेते म्हणजे रजनीकांत. रजनीकांत यांचा जन्म एका मराठी कुटुंबात 12 डिसेंबर 1950 मध्ये झाला. त्यांचं मूळ नाव ‘शिवाजीराव गायकवाड’ हे आहे.
आपल्या चित्रपट सृष्टीतील प्रवासात त्यांनी अनेक अडचणीचा सामना केला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीत खूपच बेताची होती. पैशांच्या कमतरतेमुळे रजनीकांत यांना काही काळ कुलीचं काम करावं लागले.
त्यानंतर काही दिवस त्यांनी कंडक्टरची नोकरी देखील केली. पण, त्या दरम्यान त्यांच्या एका मित्राने त्यांच्यातील लपलेले ज्ञान ओळखले होते. त्यांच्या मित्राने 1974 मध्ये मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये नाव दाखल करण्यासाठी खूप मदत केली.

तिथे नाव नोंदवल्यानंतर रजनीकांत हे तमिळ बोलायला शिकले. परंतू, चित्रपट सृष्टीत येण्यासाठी त्यांना त्यांचे नाव बदलावे लागले. म्हणून त्यांनी त्यांचं नावं बदलून रजनीकांत असे ठेवले. 1975 मध्ये त्यांचा पहिला तमिळ चित्रपट अपूर्वा रांग गल हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामध्ये रजनीकांत यांना सहायक अभिनेत्याचा रोल मिळाला होता. यानंतर त्यांनी कन्नड चित्रपटात देखील काम केले. त्यांना एका नंतर एक ऑफर्स मिळू लागल्या.
रजनीकांत यांनी दोस्ती दुश्मन, बुलंद , गिरफ्टर, इन्सानिया की देवता, फूल बने अंगारे, इन्साफ कौन कारेगा, 2.0 यांसारखे सुपरहिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले आहे. रजनीकांत यांच्या चित्रपट सृष्टीतील या योगदानासाठी 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रजनीकांत हे दक्षिण भारतच नव्हे तर संपूर्ण भारतातील चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार आहे. एवढच काय पण रजनीकांत हे आशियातील सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकाचा येतात. त्यांनी त्यांच्या ‘कबाली’ या चित्रपटासाठी 60 कोटी रुपये घेतले होते. तर ‘2.0’ या चित्रपटासाठी त्यांनी 80 कोटी इतके मानधन घेतले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सनी देओल सोडाच, रजनीकांत यांच्यावरही भारी पडली होती श्रीदेवी; तिनंच ठरवलेलं सिनेमात कुणाला करायचं कास्ट
जेव्हा रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते 10 रुपये; पुढे जे झाले, त्याने तुम्हीही व्हाल हैराण