अभिनेत्री मृणाल ठाकूर या अभिनेत्रीने अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे तिच्या सीता रामम या चित्रपटातील अभिनयामुळे ती जास्त चर्चेत आली. तिने नूरजहाँ ही भूमिका करुन तिने सर्व चाहत्यांच्या मन जिकंले. मृणाल ही अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. नुकतीच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती ज्वेलरी फ्लॉंट करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात एका चाहत्याने तिला तिला थेट प्रपोज केले. पण विशेष म्हणजे तिने त्यावर मृणालने त्याला उत्तर दिले आहे.
मृणालने (Actress Mrunal Thakur)शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती तामिळ गाणं ‘उन्नाकुल नाने’ वर तिची ज्वेलरी फ्लाँट करत आहे. याच व्हिडीओवर एका चाहत्याने “मेरी तरफ से रिश्ता पक्का है” म्हणजेच माझ्याकडून या नात्याला होकार आहे, अशी कमेंट केली. त्यावर मृणालनेही त्याला भन्नाट उत्तर देत ‘माझ्याकडून नकार आहे’, अशी कमेंट केली.

View this post on Instagram
तिच्या या कमेंटनंतर काहींनी त्या युजर्सची खिल्ली उडवली. तर काहींनी मात्र मृणालने त्याची खिल्ली उडवल्याबद्दल हसणारे टाकत त्यावर प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी त्या चाहत्याला सहानुभूती दिली. तसेच एका यूजर्सने ‘बरं झाल तु नाही म्हणाली नाहीतर मी सिंगलच राहिलो असतो, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजर्सने ‘प्रस्ताव चांगला आहे पण स्वीकारू नको’ अशी कमेंट केली आहे. ‘मी कधीपासून लाईन मध्ये उभा आहे माझा नंबर कधी येईल’ अशी कमेंट एका यूजर्सने केली आहे. अशा एकापेक्षा एक प्रतिक्रिया तिच्या या कमेंटवर येत आहे.
तिच्या व्हिडीओला 7 हजार 68 लाईक्स आहे. आणि चाहत्याच्या कमेंट वर मृणालने दिलेलय उत्तर यामुळे 3327 यूजर्सच्या कमेंट्स आल्या आहे. मृणालने चाहत्याला दिलेल्या या उत्तराचा स्क्रीन शॉट चांगलाच व्हायरल झाला आहे. (bollywood actress mrunal thakur fan propose her for marriage mrunal intersting answer comment viral)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रार्थना बेहेरेने शेअर केला १५ वर्षांनी आयुष्यात आलेला ‘तो’ अविस्मरणीय अनमोल दिवस
‘ही नव्या पुस्तकाची सुरुवात’ या सकारात्मक नोटवर अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केले तिचे सुंदर फोटो