बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा नुकताच लग्नबंधनात अडकला. त्याने गुरुवारी (४ फेब्रुवारी) मुंंबईत चित्रपट निर्माता करिम मोरानी यांची लहान मुलगी शजा मोरानी हिच्यासोबत कोर्टात लग्न केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ५ फेब्रुवारीला दोघांनीही हिंदू रिती- रिवाजानुसार लग्न केले. या दोघांचाही संगीत समारंभ झाला, यामध्ये प्रियांकची आई म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरेदेखील थिरकताना दिसल्या. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पद्मिनी यांच्या चेहऱ्यावर मुलाच्या लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. त्यांनी आपल्या मुलासोबतही ढोलकीच्या तालावर चांगलाच डान्स केला.
https://www.instagram.com/p/CK3vuTyjVR9/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वी माध्यमांशी बोलताना करिम यांनी म्हटले होते की, “प्रियांक शर्मा खूप चांगला मुलगा आहे. तो माझी मुलगी शजा मोरानीची काळजी घेतो. याव्यतिरिक्त तो एका चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे. पद्मिनी आणि टूटू माझ्या मुलीची काळजी घेतील.”
या लग्नात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसह तिची आई शिवांगी कोल्हापुरे, अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनीता यांचा समावेश होता. सोबतच चित्रपट निर्माता निखिल द्विवेदीसह त्याची पत्नी आणि इतर सेलिब्रिटीही उपस्थित होते.
पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्माने या वर्षाच्या सुरुवातीला ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेता आणि खासदार रवी किशन यांची मुलगी रिवा किशन देखील दिसली होती.
शजा मोरानीबद्दल बोलायचं झालं, तर शजाने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘ऑलवेज कभी कभी’ आणि ‘हॅप्पी न्यू ईयर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला शजा, तिची बहीण जोहा आणि वडील करीम मोरानी कोरोनाच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर हे संपूर्ण कुटुंब चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. हे सर्वजण मुंबईच्या रुग्णालयात उपचार घेऊन ठीक झाले होते.
हेही वाचा-
शुभमंगल सावधान! पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलाने ‘या’ निर्मात्याच्या मुलीसोबत थाटला संसार; कलाकारांनी लावली हजेरी