सध्या लग्नाचा मोसम आहे. अनेक सेलिब्रिटी नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. यामध्ये आता बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि टूटू शर्मा यांचा मुलगा प्रियांक शर्मानेही लग्न केले आहे. त्याने गुरुवारी (४ फेब्रुवारी) मुंंबईत चित्रपट निर्माता करिम मोरानी यांची लहान मुलगी शजा मोरानी हिच्यासोबत लग्न केले आहे. या दोघांनीही मागील वर्षी ९ डिसेंबरला विवाह निबंधक कार्यालयात लग्नाचा अर्ज दिला होता. या दोघांचेही लग्न थाटामाटात पार पडले.
प्रियांक शर्माही आपली आई पद्मिनी कोल्हापुरेसोबत डान्स करताना दिसला. प्रियांकने लग्नामध्ये कुर्ता आणि पायजमा घातला होता. याव्यतिरिक्त त्याने कोल्हापुरी चप्पलही घातली होती. यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
प्रियांक आणि शजा हे दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. आता त्यांचे लग्न झाले आहे. परंतु त्यांनी हनीमूनला कोठे जाणार याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. कदाचित कोरोना व्हायरसमुळे याची घोषणा केलेली नाही.
https://www.instagram.com/p/CK3vuTyjVR9/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वी माध्यमांशी बोलताना करिम यांनी म्हटले होते की, “प्रियांक शर्मा खूप चांगला मुलगा आहे. तो माझी मुलगी शजा मोरानीची काळजी घेतो. याव्यतिरिक्त तो एका चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे. पद्मिनी आणि टूटू माझ्या मुलीची काळजी घेतील.”
या लग्नात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसह तिची आई शिवांगी कोल्हापुरे, अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनीता यांचा समावेश होता. सोबतच चित्रपट निर्माता निखिल द्विवेदीसह त्याची पत्नी आणि इतर सेलिब्रिटीही उपस्थित होते.
हेही वाचा-
एवढी लोकप्रिय अभिनेत्री, तरीही प्रीतीने वयाने १० वर्षांनी लहान व्यक्तीशी केले होते लपूनछपून लग्न