Sunday, April 13, 2025
Home बॉलीवूड बाबा सिद्दीकीच्या पार्टीत पलकच्या रिव्हिलिंग ड्रेसवर संतापले नेटकरी; म्हणाले, “तु इफ्तारसाठी आली की आयटम साँगसाठी?”

बाबा सिद्दीकीच्या पार्टीत पलकच्या रिव्हिलिंग ड्रेसवर संतापले नेटकरी; म्हणाले, “तु इफ्तारसाठी आली की आयटम साँगसाठी?”

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्यांच्या या इफ्तार पार्टीत बाॅलिवूडपासून ते हाॅलिवूडपर्यंत अनेक स्टर्सनी उपस्थिती लावून चार चांद लावले. बाबा सिद्दीकीच्या या पार्टीत सलमान खानही त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटाच्या स्टारकास्टसोबत पोहोचला होता. यामध्ये पूजा हेगडे आणि पलक तिवारी यांचाही समावेश होता. मात्र, दोघेही त्यांच्या लूकमुळे माेठ्या प्रमाणात ट्राेल झाल्या. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

या शानदार पार्टीमध्ये पलक तिवारी (palak tiwari) ग्रे रंगाचा लेहेंगा चोली परिधान करून पार्टीत पोहोचली. लेहेंग्यासोबतच तिने नेकलाइन असलेला ब्लाउज कॅरी केला होता, तर तिचे केस खुले साेडले हाेते. पलक या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पार्टीत प्रवेश करताच तिने बाबा सिद्दीकीसोबत पॅपराझींना पोजही दिली. मात्र, अभिनेत्रीचा हा लूक नेटकऱ्यांना काही आवडला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीतील पलक तिवारीचा हा व्हिडिओ माेठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. व्हिडिओवर कमेंट करताना, साेशल मीडिया युजर्सने विचारले की, ‘तिने रिवीलिंग कपडे इफ्तार पार्टीमध्ये येण्साठी परिधान केले की आयटम साॅंगसाठी.’

अशात एक साेशल मिडिया युजर संतापून म्हणाला, “दिसायला छान आहे… पण या पार्टीसाठी योग्य नाही. इतक्या वर्षांपासून इफ्तार पार्ट्या होत आहेत, या लोकांना साधा ड्रेस कोड समजत नाही का.”

अभिनेत्री पूजा हेगडेबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेत्री काळ्या रंगाची चमकदार साडी परिधान करून इफ्तार पार्टीत पोहोचली हाेती. तिने साडीसोबत डीप नेक बॅकलेस ब्लाउज कॅरी केला होता. संपूर्ण लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. मात्र, रिवीलिंग कपड्यांमुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.(bollywood actress palak tiwari trolled for revealing clothes at baba siddique iftar party watch viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

आर माधवनचा लेक वेदांतने पुन्हा एकदा देशासाठी जिंकली 5 सुवर्णपदके; अभिनेता म्हणाला, “आम्हाला अभिमान आहे…”
भाईजानने उघडपणे शहनाज गिलच्या चाहत्यांवर साधला निशाना; म्हणाला, ‘सिद्धार्थ शुक्लाचे नाव घेणे बंद करा…’

हे देखील वाचा