Saturday, December 7, 2024
Home टेलिव्हिजन भाईजानने उघडपणे शहनाज गिलच्या चाहत्यांवर साधला निशाना; म्हणाला, ‘सिद्धार्थ शुक्लाचे नाव घेणे बंद करा…’

भाईजानने उघडपणे शहनाज गिलच्या चाहत्यांवर साधला निशाना; म्हणाला, ‘सिद्धार्थ शुक्लाचे नाव घेणे बंद करा…’

किसी का भाई किसी की जान‘च्या प्रमोशनसाठी सलमान खान त्याच्या संपूर्ण स्टारकास्टसह ‘द कपिल शर्मा शो‘मध्ये पोहोचला होता. यादरम्यान, त्याने शहनाजच्या चाहत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांनी सिद्धार्थचे नाव वारंवार काढून अभिनेत्रीला त्रास देऊ नये. शहनाज देखील सलमान खानशी सहमत असल्याचे दिसून आली आणि तिच्या लव्ह लाईफबद्दल बाेलली. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पूजा हेगडे, राघव जुआल, सिद्धार्थ निगमसह सलमान खानने खूप मजा केली. त्याने सर्वांचीच इंट्रोडक्शन करून दिले आणि जेव्हा शहनाजची वेळ आली तेव्हा तो म्हणाला की, “तिचे चाहते तिला मूवऑन करूच देत नाहीत. साेशल मीडिया युजर्स दररोज सिद्धार्थ शुक्लाबद्दल काहीतरी पोस्ट करतात आणि त्याचा शहनाजला त्रास होतो.”

सलमान खान पुढे म्हणाला, “सिद्धार्थ शुक्ला आता या जगात नाही, याचा विचार साेशल मीडिया युजर्स यांनी करायला हवा.” याचसाेबत अभिनेता शहनाजची बाजू घेत पुढे म्हणाला, “तिला मूवऑन करण्याचा अधिकार नाही का?” यावर शहनाज उत्तर देते की, “हो, मी तयार आहे. पुढे जाण्यासाठी, माझ्या आयुष्यात प्रेम शोधण्यासाठी.” यावर कपिल गंमतीने म्हणतो की,”असे म्हणा की, तुझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुला सापडेल.” प्रतीउत्तरात शहनाज बिनधास्तपणे म्हणते की, “मी प्रेम तर पूर्णच करेन”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

‘किसी का भाई किसी की जान’च्या ट्रेलर लॉन्च वेळी सलमान खानने शहनाजला मीडियासमोर सांगितले हाेते की, ‘तू तुझा भूतकाळ विसरून जा आणि आता पुढे जा.’ यावर शहनाजने उत्तर दिले की, “तुला काय म्हणायचे आहे ते मला समजत नाही”. अशात आजकाल शहनाजचे नाव तिचा को-स्टार राघव जुआलसोबत जोडले जात आहे.(bollywood actor salman khan openly gave a warning to shehnaaz gill fans at the kapil sharma show saluu bhai says stop taking siddharth shukla name again and again)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महिमा चौधरीला तिच्या कॅन्सरमधून बरे होण्यासाठी ‘हा’ शो ठरला महत्वाचा, अभिनेत्रीने मानले आभार

आर माधवनचा लेक वेदांतने पुन्हा एकदा देशासाठी जिंकली 5 सुवर्णपदके; अभिनेता म्हणाला, “आम्हाला अभिमान आहे…”

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा