Saturday, June 29, 2024

प्रियांकाची लेक पाहून परिणितीलाही वाटतो हेवा? म्हणाली, ‘मलाही आई व्हायला… ‘

परिणीती चोप्रा ही इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. यासोबतच तिचा उत्कृष्ट अभिनय लोकांना प्रचंड आवडतो. अभिनेत्रीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती नेहमी तिच्या कामावर जास्त लक्ष देते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 34 वर्षांची बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री अजूनही सिंगल आहे. याबाबतचा दावा खुद्द परिणीतीने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

परिणीती चोप्रा (parineeti chopra) हिने माध्यमाशी संवाद साधताना दावा केला की, “सध्या तिच्या आयुष्यात काेणताही मुलगा नाही, पण लग्नाची चर्चा आहे.” ती म्हणाली, “मला लग्न करायला आणि मुलं जन्माला घालायला आवडेल.” परिणिती पुढे म्हणाली की, तिची चुलत बहीण प्रियंका चोप्राप्रमाणे तिलाही तिच्या करिअर आणि आयुष्यात चांगला समतोल हवा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

परिणीतने प्रियंकाच्या लेकीला म्हणटले ‘मॅजिकल गर्ल’
यासोबतच परीणीतीने तिची चुलत बहीण प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आणि तिची मुलगी मालती मेरी चोप्रा यांच्याबद्दलही सांगितले. प्रियांकाच्या मुलीला भेटण्यासाठी ती खूप उत्सुक असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. परीणीती प्रियंकाच्या लेकीला भेटण्यासाठी अनेकदा वेळही काढते. बातचीत दरम्यान परिणीतीने मालतीला ‘मॅजिकल गर्ल’ म्हटले आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, परी म्हणाली, ‘ती सर्वात सुंदर छोटी गोष्ट आहे आणि एक आशीर्वाद आहे.’

परिणीती चोप्रा हिच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाले, तर परिणीती लवकरच दोन आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सध्या, ती रियल स्टोरी बेस्ड फिल्म ‘चमकिला’ आणि ‘कॅप्सूल गिल’ या चित्रपटांसाठी शूटिंग करत आहे.(bollywood actress parineeti chopra claimed not have boyfriend in life now but reveals plans to have kids of her own)

हे देखील वाचा