Wednesday, October 9, 2024
Home बॉलीवूड राघव चड्ढा यांनी परिणीतीसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर तोडले मौन; ब्लश हाेत म्हणाले…

राघव चड्ढा यांनी परिणीतीसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर तोडले मौन; ब्लश हाेत म्हणाले…

आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा नुकतेच एकत्र दिसले हाेते. अशात दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल हाेते आहेत, त्यामुळे दोघेही एकत्र असल्याच्या अफवा उडत आहेत. अशात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंवर नेते राघव चढ्ढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा (raghav chadha) आणि परिणीती (parineeti chopra) गुरुवारी (दि.23 मार्च)ला एका रेस्टॉरंटमध्ये दिसले. त्यावेळी दाेघांनीही हसून पाेज दिल्यात. अशात आता दाेघांच्या अफेअरच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. राज्यसभेच्या अध्यक्षांनी नुकतेच सभागृहादरम्यान सांगितले की, सोशल मीडियावर तुम्हाला भरपूर स्पेस मिळत आहे. आजचा दिवस कदाचित तुमच्यासाठी मौनाचा दिवस आहे. हे ऐकून सभागृहात उपस्थित सर्व नेते हसू लागले. यावर नेते राघव चढ्ढा यांनीही मीडियासमोर म्हटले की, “तुम्ही मला राजकारणासंबधी प्रश्न विचारा परिणीतीबद्दल नाही.” तरीही मीडियाने यावर अनेक प्रश्न विचारले. यावर आतापर्यंत तरी अभिनेत्री परिणीतीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

गुरुवारच्या भेटीनंतर राघव चढ्ढा आणि परिणीतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यानंतर लोकांनी त्यांच्या नात्याची चर्चा सुरू केली. काही लोक म्हणतात की, ‘राघव आणि परिणीती एकमेकांना डेट करत आहेत का?’ मात्र, या प्रश्नावर दोघांकडूनही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मंडळी आम्ही तुम्हाला सांगतो की, डिनरदरम्यान दोन्ही सेम कपड्यांमध्ये दिसले होते. त्यावेळी अभिनेत्रीने पांढरा शर्ट आणि पँट घातली होती, तर राघव चढ्ढा यांनीही पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

परिणीतीच्या वर्कफ्रंटबाबत बाेलायचे झाले, तर ती ‘कॅप्सूल गिल’ आणि ‘चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटांपूर्वी परिणीती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ऊंचाई’ या चित्रपटात दिसली होती. (bollywood actress parineeti chopra raghav chadha reacted on viral dinner photo aap leader said ask me political question )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अभिषेक माझा गौरव’ अभिषेक बच्चनला ‘तो’ पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केले लेकाचे कौतुक

‘3 इडियट्स’च्या सिक्वेलची पुष्टी, करीना कपूर व्हिडिओ शेअर करत म्हणाली, ‘मी सुट्टीवर गेले होते अन्…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा