Wednesday, July 3, 2024

भारत जाेडाे यात्रेत उर्मिलाचा सहभाग, राहुल गांधीचा हात हातात घेऊन चालली अभिनेत्री

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. अशातच आता या उपक्रमात अभिनेत्री-राजकारणी उर्मिला मातोंडकरही काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सामील झाल्या आहेत. यादरम्यान, उर्मिला मातोंडकर राहुल गांधींचा हात धरून चालताना दिसल्या. जम्मू-काश्मीरमध्ये कड्याक्याची थंडी पडत असतानाही राहुल गांधी पूर्वीप्रमाणेच पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसले. अशात आता उर्मिला आणि राहुल गांधी यांचे फोटो सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीमार्गे जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रेत सामील होण्यापूर्वी उर्मिला (urmila matondkar) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये त्या म्हणाल्या की, “या थंडीत मी तुमच्याशी जम्मूहून बोलत आहे. आता थोड्याच वेळात मी राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. एक व्यक्ती, एक पक्ष आणि काही लोकांच्या महान भावनेतून ही यात्रा वाढली आहे. या भेटीने हा उत्साह वाढला आहे. या भावनेचे नाव भारतीयत्व आहे. त्यात खूप प्रेम, त्याग, श्रद्धा, बंधुभाव आणि सद्भावना आहे. हे भारतीयत्व आपल्या सर्वांना जोडून ठेवते. मला कुठेतरी वाटतं की, हे जग प्रेम आणि सद्भावनेवर चालतं, भीतीवर नाही. माझ्यासाठी या यात्रेचे महत्त्व राजकीयापेक्षा सामाजिक आहे. जय भारत जय हिंद.”

उर्मिला मातोंडकर ही 1990च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींंपैकी एक आहे. उर्मिला मातोंडकर यांनी सहा महिन्यांनंतर सप्टेंबर 2019 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला आणि 2020 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. मनोरंजन जगतातील अनेक सेलिब्रिटी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत. यामध्ये पूजा भट्ट, अमोल पालेकर, रिया सेन, सुशांत सिंग, स्वरा भास्कर, रश्मी देसाई, आकांक्षा पुरी आणि काम्या पंजाबी यांचा समावेश आहे.(bollywood actress politician urmila matondkar took part in rahul gandhi bharat jod yatra in jammu)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कॅमेऱ्यासमोर हवेत उडला अनुष्काचा टॉप; युजर्स म्हणाले, ‘घाबरा कोहली भाऊ…’

महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा परत येतोय…हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ ची घोषणा

हे देखील वाचा