Thursday, February 22, 2024

या चिमुकलीने अनेक सुपरस्टार्ससोबत केले आहे काम, लवकरच दिसणार सलमानसाेबत; ओळखा पाहू काेण?

स्टार्सचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा ट्रेंड अजूनही सुरूच आहे. अशात आता एका अभिनेत्रीचा फोटो समोर आला आहे, ही मुलगी साऊथमध्ये आणि आता बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालत आहे. फोटोत दिसणारी ही गोलू मोलू मुलगी आहे तरी काेण? चला जाणून घेऊया…

बॉलिवूड स्टार्स सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. अशात आता दक्षिण आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप साेडणाऱ्या आणखी एका अभिनेत्रीचा फोटो इंटरनेटवर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे. तिच्या बालपणीचा हा फोटो समोर येताच ती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषयी ठरली आहे. ही गाेंडस मुलगी आता लवकरच बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत एका चित्रपटातही दिसणार आहे. एवढ्या इशाऱ्या देऊनही तुम्ही या मुलीला ओळखू शकला नसाल, तर ही गोलू-मोलू मुलगी कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगताे…

ही अभिनेत्री दुसरी कुणी नसून पूजा हेगडे (pooja hegde) आहे, जिने बॉलिवूड आणि साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. पूजाला आज काेणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीची फॅन फॉलोइंगही खूप जास्त आहे. आपल्या एक्सप्रेशन आणि अनाेख्या स्टाइलने पुजाने चाहत्यांना वेड लावले आहे. पूजाने सुरुवातीला बॉलिवूडचा हँडसम हंक ऋतिक रोशनसोबत ‘मोहनजोदड़ो’ चित्रपटात काम केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

ऋतिक रोशन आणि अक्षय कुमार सारख्या स्टार्ससोबत काम केल्यानंतर पूजा लवकरच सलमान खानसोबत दिसणार आहे. सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात पुजा मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. याव्यतिरिक्त यात शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि राघव जुयाल यांचाही समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे, तर साजिद नाडियादवाला यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.(bollywood actress pooja hegde shared her unseen photo from childhood memory actress romance with salman khan in k abhi eid kabhi diwali )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थने पत्नी कियाराला समर्पित केला बेस्ट स्टाइलचा पुरस्कार, अभिनेत्रीने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

दलजीत अ्न निखिलने पायावर बनवला अनोखा टॅटू, उर्दू शब्दांमध्ये दडला आहे खास अर्थ

हे देखील वाचा