Monday, March 4, 2024

दलजीत अ्न निखिलने पायावर बनवला अनोखा टॅटू, उर्दू शब्दांमध्ये दडला आहे खास अर्थ

टिव्ही अभिनेत्री दलजीत कौर 18 मार्च 2023 रोजी निखिल पटेलसोबत लग्न बंधनात अडकली. तिचे लग्न एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते, ज्याची चर्चा अजूनही साेशल मीडियावर हाेत आहे. दलजीत आणि निखिल लग्नासापासून ते  हनीमूनपर्यंतच्या राेमॅंटिक मुव्हमेंट त्यांच्या चाहत्याना दाखवताना दिसले. अशात अलीकडे, दलजीत- निखिलने त्यांचा टॅटू शाे केला आहे, जाे त्यांच्या लग्नाला दुसरी संधी देण्याच्या निर्णयाला समर्पित आहे.

23 मार्च 2023 रोजी एका पॅपराझी पेजने दलजीत कौर (dalljiet kaur) आणि निखिल पटेल (nikhil patel) यांचे न पाहिलेला फोटो शेअर केले होते. फाेटाेत, प्रेमात वेडे झालेले हे जोडपे त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी समर्पित टॅटू काढताना दिसले. या टॅटूमध्ये दोन हातांनी क्लॅपर बोर्ड धारण केलेला दिसत आहे, त्यावर ‘टेक 2’ असे लिहिलेले आहे. खरे तर, त्यांचा हा टॅटू एकमेकांबद्दलचे प्रेम आणि स्वीकृती सिद्ध करत आहे.

त्यांच्या लग्नानंतर, दलजीत कौर आणि निखिल पटेल यांनी त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांसाठी रिसेप्शन पार्टिचे आयोजन केले होते. दलजीतने 20 मार्च 2023 रोजी तिच्या IG हँडलवर फाेटाेंची सीरिज शेअर केली. रिसेप्शनसाठी दिलजीतने गुलाबी रंगाचा सॅटिन गाउन परिधान केला होता. फाेटाेसाठी पोज देताना ती तिचे मंगळसूत्र आणि बांगड्या फ्लॉन्ट करताना दिसली.

दुसरीकडे, निखिल, पांढऱ्या टी-शर्ट आणि मॅचिंग पॅंटसह चेकर्ड टक्सीडोमध्ये हॅंडसम दिसत होता. मात्र, लक्ष वेधून घेतले ते त्यांच्या अनोख्या रिसेप्शन केकने. ‘Take to 18/3/2023/’ असा क्लॅपर बोर्ड असलेला थ्री टायर चॉकलेट केक या जोडप्याने दुसऱ्या लग्नाला डेडिकेट केला होता.(tv actress dalljiet kaur nikhil patel got unique tattoos on feet know the meaning)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी त्याला बजावले होते स्वतःला…’ स्मृती इराणी यांनी दिला सुशांत सिंगच्या आठवणींना उजाळा

कपिल शर्माला शोमध्ये ‘हा’ शब्द वापरण्यास केली मनाई; कारण जाणून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा