Monday, July 1, 2024

‘माझी आई मारत होती, बाबा ओरडत होते…’, वर्ल्डकपमध्ये कपडे काढल्याच्या वक्तव्यावर पूनम पांडेने उघडले गुपित

पूनम पांडे 11 मार्च रोजी 32 वर्षांची होत आहे. तिच्या वाढदिवसापूर्वी, तिची एक मुलाखत साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती विश्वचषक वादाबद्दल बाेलली. पूनम पांडे 2011 मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आली, जेव्हा तिने भारतात चालू असलेल्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान असे विधान केले होते की, जर भारताने विश्वचषक जिंकला, तर ती तिचे कपडे काढून टाकेल. त्यानंतरही पूनम पांडे तिच्या बोल्ड लूकमुळे आणि न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत हाेती. अशात आता पूनम पांडेने हे विधान का केले ते सांगितले आहे. काय म्हणाली पूनम? चला जाणून घेऊया…

माध्यमांशी बोलताना पूनम पांडे (poonam pandey) म्हणाली, “मी तेव्हा 18 वर्षांची होते आणि विचार करत होते की, आयुष्यात काय करावं? चला काहीतरी मोठे करूया. मी पाहिलं क्रिकेट चालू आहे, वाह बेटा, अख्खा भारत क्रिकेट पाहतो. पूनम, तुला क्रिकेटचे ज्ञान आहे ना, अजिबात नाही. क्रिकेटपटूंची नावे माहीत आहेत का? अजिबात नाही. मला काही कळत नाही, पण मला काहीतरी करायचं आहे. आपण एक स्टेटमेंट देऊ आणि ते एक माेठे स्टेटमेंट असेल, मी ते विधान केले आणि भारत जिंकला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mirchi Plus (@mirchiplus)

पूनम पांडे पुढे म्हणाली, “मला भीती वाटली की, आता मला हे करावे लागेल. माझ्या घरी ड्रामा सुरू झाला हाेता. माझी आई मला मारत हाेती, माझे बाबा ओरडत हाेते की, ‘तू काय केलेस’.

पूनम पांडे पुढे म्हणाली, “मी याबद्दल कधीही बोली नाही, मला कोणीही ओळखत नाही, प्रत्येकाला माहित आहे की, कॉन्ट्रोवर्सी क्वीन जिला नेहमीच तिची बॉडी शो ऑफ करायला आवडते. होय मी केले कारण, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी तिथे कसे जाऊ हा एकच पर्याय माझ्या मनात आला. मी ही संधी साधली कारण, मला इतरांसारखी तडजोड करायची नव्हती. असे पूनमने मुलाखती दरम्यान सांगितले.(bollywood actress poonam pandey on world cup controversial statement to took off her clothes share mom dad reactions)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता आकाश कुंभारचे ‘गडद अंधार’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण

जेव्हा ‘पा’मध्ये अमिताभची आई हाेण्यास सांगितले विद्यााल; अभिनेत्री म्हणाली, ‘तुझ्या डाेक्यात…’

हे देखील वाचा