Tuesday, February 18, 2025
Home बॉलीवूड अय्याे! करणवीर झाला पूनम पांडेसोबत रोमँटिक; ट्रोलर्स म्हणाले, ‘लवकरच घटस्फोट’

अय्याे! करणवीर झाला पूनम पांडेसोबत रोमँटिक; ट्रोलर्स म्हणाले, ‘लवकरच घटस्फोट’

टेलिव्हिजन अभिनेता करणवीर बोहरा आणि चित्रपट अभिनेत्री पूनम पांडे यांचे नवीन गाणे ‘तेरे जिस्म से’ रिलीज झाले आहे. आता हे दोघेही या गाण्याच्या लाँच कार्यक्रमाला पोहोचले होते. यावेळी दोघांनीही बोल्ड पोज दिल्या आहेत. याआधी दोघे ‘लॉकअप सीझन वन‘मध्ये दिसले होते. आता हे दोघेही गाण्याच्या लाँचच्या वेळी एकत्र मस्ती करताना दिसले.

अभिनेत्री पूनम पांडे (poonam pandey) आणि अभिनेता करणवीर बोहरा (karanvir bohra) फोटोग्राफरला पोज देताना दिसत आहेत. या निमित्ताने दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. ‘तेरे जिस्म’ या गाण्याचे बोल आहेत. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ येत आहेत. दोघेही खूप हॉट दिसत आहेत. दोघांची स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

युजर्सने करणवीर बोहराला ट्राेल करत दिल्या प्रतिक्रिया
यावर अनेकांनी करणवीर बोहराला ट्रोलही केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “हा पुन्हा आला हिच्यासाेबत, आपाला डायवोर्स स्वत:च कंफर्म करत आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, “आता तो दिवस दूर नाही जेव्हा घटस्फोटाच्या बातम्याही येतील.” तर एक युजरने चक्क कमेंट करत लिहिले, “आता याचा घटस्फोटाचा नंबर आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हाॅटनेससाठी प्रसिद्ध आहे पूनम पांडे
पूनम पांडे ही एक चित्रपट अभिनेत्री आहे. ती अनेकदा तिचे  बोल्ड फोटो आणि व्हिडिओ साेशल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत असते. याशिवाय ती हॉटनेससाठीही प्रसिद्ध आहे. त्याच वेळी, करणवीर बोहराच्या काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर करण एक टेलिव्हिजन अभिनेता आहे आणि त्यांनी अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. याशिवाय तो अनेक म्यूजिकमध्येही दिसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवीने विजय देवरकोंडाबाबत केला मोठा खुलासा, सांगितले अभिनेत्याचे रिलेशनशिप स्टेटस

सिनेसृष्टीतील ‘हे’ बहीण- भाऊ एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव, पाहा भन्नाट फाेटाे

हे देखील वाचा