इंटरनॅशनल स्टार प्रियांका चोप्रा सध्या तिची मुलगी मालती आणि पती निकसोबत वेळ घालवत आहे. ती सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधत असते. अशात अलीकडेच पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे, जाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.
प्रियंका चोप्रा (priyanka chopra) हिने नुकतेच इन्स्टाग्रामवर लेक मालतीसह एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये लिहिले की, ‘ग्लॅम विथ मम्मा.’ या फोटोमध्ये अभिनेत्रीसोबत तिची लाडकी मुलगी मालती मेरीही दिसत आहे. फाेटाेत प्रियांका तिचा मेकअप करत आहे आणि मालतीला तिच्या मांडीवर घेतले आहे. फाेटाे पाहताना मालती तिच्या आईकडून मेकअप टिप्स घेत आहे असे वाटते.
अशा प्रकारे जिथे प्रियंकाच्या मुलीच्या फोटोचा बोलबाला आहे, तर दुसरीकडे अभिनेत्रीने वर्षांनंतर हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर हॉलीवूडमध्ये काम मिळण्याच्या वास्तवावर मौन सोडले आहे. प्रियांकाने बॉलिवूडमध्ये अपेक्षित काम मिळत नसल्याचा खुलासा केला आहे. याशिवाय काही लोकांशी तिचे संबंधही बिघडले असल्याचे तिने सांगितले आहे. एवढेच नाही, तर येथे आपल्याला कोपऱ्यात टाकून राजकारण केले जात असल्याचेही अभिनेत्रीच म्हणणे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रियंकाला बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जावे लागले आहे.
View this post on Instagram
प्रियंका चाेप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलयचे झाले, तर ती लवकरच स्पाय थ्रिलर सीरिझ सिटाडेलमध्ये दिसणार आहे. यासोबतच ती ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ या रोमँटिक कॉमेडीमध्येही दिसणार आहे. याशिवाय ती बॉलिवूड चित्रपट ‘जी ले जरा’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याव्यतिरिक्त अभिनेता फरहान अख्तर, आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ देखील आहेत. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात होणार आहे.(bollywood actress priyanka chopra is teaching makeup to one year old daughter malti marie chopra shared cute photo)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खळबळजनक! अजून एका लोकप्रिय अभिनेत्रीने संपवले जीवन, अभिनयासोबतच गायनातही होती कुशल
‘करण-अर्जुन’ सिनेमासाठी सलमान खान नाही तर ‘हा’ सुपरस्टार होता पहिली पसंत, राकेश रोशन यांचा खुलासा