Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड प्रियंका चोप्राने सांगितला तिच्या आणि निकच्या जुळणार्‍या टॅटूचा अर्थ, प्रपोजलशी आहे संबंध

प्रियंका चोप्राने सांगितला तिच्या आणि निकच्या जुळणार्‍या टॅटूचा अर्थ, प्रपोजलशी आहे संबंध

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या प्रियांका अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. यासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. प्रियंका अनेकदा इन्स्टाग्रामवर पती निकसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. अलीकडेच, प्रियांकाने तिच्या टॅटूचे रहस्य उघड केले आणि सांगितले की, निकने देखील असाच एक टॅटू बनवला आहे.

प्रियांका (priyanka chopra) हिने एका मुलाखतीत खुलासा केला की, तिचे टॅटू डिझाइन निकच्या प्रपोजलपासून कसे इंस्पायर होते. प्रियांकाने तिच्या मनगटाच्या बाजूला तिच्या वडिलांच्या हस्ताक्षरात ‘डॅडीज लिल गर्ल’ लिहिलेल्या तिच्या टॅटूबद्दल सांगितले. याशिवाय ती तिच्या आणि निकच्या टॅटूबद्दलही बाेलली. प्रियांकाने सांगितले की, तिच्या कानामागे एक चेक आणि एक बॉक्स आहे. हा टॅटू तिचा नवरा निक याने त्याच्या हातावर बनवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

या टॅटूचा अर्थ सांगताना प्रियांका म्हणाली की, “मला प्रपोज करताना निक म्हणाला, ‘मी त्याचे सर्व बॉक्स चेक केले आहेत, आता मी आणखी एक चेक करू का?’ या आधारे आम्ही दोघांनी जुळणारे टॅटू बनवले.” तिच्या दुसऱ्या टॅटूबद्दल बोलताना प्रियंका म्हणाली की, “तिच्या हातावरील जगाचा नकाशा खास आहे. कारण, जेव्हा ती हात खाली करते तेव्हा भारत तिच्या हृदयाच्या जवळ येतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

निक आणि प्रियांकाचे लग्न डिसेंबर 2018 मध्ये जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये झाले होते. आधी त्यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले, नंतर ख्रिश्चन धर्मानुसार लग्न केले. दोघांची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे. प्रियांकाच्या म्हणण्यानुसार, दोन महिन्यांच्या डेटिंगनंतर निकने तिला प्रपोज केले. तिलाही निक खूप आवडला, त्यामुळे तिने लगेच हो म्हटलं.(bollywood actress priyanka chopra reveals hidden meaning behind her and nick jonas matching tattoos when he proposed)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लोकांना शाहरुखचा…’, पठाण वादावर शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

मोठी बातमी! ज्युनिअर एनटीआरच्या जवळच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका

हे देखील वाचा