Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड असे काय घडले की, प्रियांका चाेप्राने जाळले हाेते हायस्कूलमधील फाेटाे, लगेच वाचा

असे काय घडले की, प्रियांका चाेप्राने जाळले हाेते हायस्कूलमधील फाेटाे, लगेच वाचा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आजकाल सतत काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत आहे. प्रियांका कधी तिच्या चित्रपटांमुळे, तर कधी बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणावरील तिच्या वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशातच आता प्रियांकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की, तिने तिच्या हायस्कूलचे अनेक फाेटाे जाळली, ज्यानंतर तिला तिच्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, प्रियांका चोप्रा (priyanka chopra) हिने ती हायस्कूलमध्ये असताना  त्यावेळचे तिचे बहुतेक फोटो कसे जाळले याबद्दल सांगितले. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, ‘ही 2000च्या दशकाच्या सुरुवातीची गाेष्ट आहे, ज्यावेळी हायलाइट्स, आय लायनर, आय शॅडो, चेन ड्रेस, लो वाइस्ट जीन्स आणि थाँग्स कॅरी केले जाते हाेते आणि इतकीच फॅशन हाेती.’

प्रियांका चोप्राकडे तिच्या हायस्कूलमधली बरीच फाेटाे होती, पण जेव्हा तिने खाेलवर विचार केला, तेव्हा तिने ती फाेटाे जाळून टाकली. अभिनेत्रीने उघड केले की, ‘तिला ती फाेटाे जाळल्याबद्दल पश्चाताप वाटतो. कारण, तिला तिचे पुस्तक लिहिण्याच्या प्रयत्नात असताना त्यांची गरज होती.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका ‘या’ चित्रपटाद्वारे बाॅलिवूडमध्ये करणार कमबॅक
अभिनेत्रीच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, प्रियांका अलीकडेच द रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये रिचर्ड मॅडन सोबत दिसली. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या या सीरिजमध्ये प्रियांकाचा दमदार अॅक्शन अवतार पाहायला मिळाला. अशात आता प्रियांका ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासाेबत कॅटरिना कॅफ आणि आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत आहे.( Bollywood actress priyanka chopra reveals she burnt her high school pictures says she came to regret the decision )

हे देखील वाचा