Friday, March 29, 2024

अनुष्का शर्माने पॅपराझीना पोज देण्यास दिला नकार; युजर्स ट्राेल करत म्हणाले, ‘आम्ही बाळाला बघितले तर,…’

बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतीच मुलगी वामिकासह फिरायला गेली होती. यादरम्यान अभिनेत्री मुंबईत स्पॉट झाली, ज्याचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. व्हिडिओमध्ये पॅपराझी अभिनेत्रीला फोटो क्लिक करण्यासाठी पाेज द्यायला सांगतात. मात्र, अनुष्का पॅपराझींला पाेज देण्यास नकार देते. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

व्हिडिओमध्ये अनुष्का (anushka sharma) पांढऱ्या ओव्हरसाईज शर्टमध्ये दिसत असून गाडीकडे जात आहे. यादरम्यान वामिका गाडीमध्ये बसलेली आहे. दरम्यान, मीडियाचे काही व्यक्ती अभिनेत्रीला फाेटाे क्लिक करण्यासाठी पाेज देण्यास सांगतात. यावर अनुष्का चिडून पॅपराझीना म्हणते, ‘मुलं माझ्यासाेबत आहे नंतर कधी’ असे म्हणत अनुष्का गाडीच्या आत जाऊन बसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अभिनेत्रीच्या व्हिडिओवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट
हा व्हिडिओ समोर येताच काही लोक अनुष्काला सपोर्ट करत आहेत, तर काही लाेकांनी तिला ट्राेल करायला सुरुवात केली आहे.  व्हिडिओ पाहून एका युजरने ट्राेल करत लिहिल की, ‘ओह! आम्ही बाळाला बघितले तर, नजर लागल का?’, तर आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘भाई, त्यांनाही पर्सनल स्पेसची गरज आहे’.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

अनुष्का या दमदार चित्रपटाद्वारे बाॅलिवूडमध्ये करणार पदार्पण
खरे तर, अनुष्का शर्मा 2018पासून रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. अशात आता अनुष्का लवकरच प्रोसित रॉय दिग्दर्शित ‘चकडा एक्सप्रेस’ या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारताची माजी क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. (bollywood actress anushka sharma speaks candidly about paparaji stopping her for photos video goes viral)

हे देखील वाचा