बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी वेब सीरिज ‘सिटाडेल’मुळे चर्चेत आहे. प्रियांका तिच्या सिटाडेल सीरिजचे जोरदार प्रमोशन करत आहे. अभिनेत्री तिच्या आगामी सीरिजमध्ये अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. त्याच वेळी, अलीकडेच तिने आपले जीवन, करिअर आणि हॉलीवूडच्या स्वप्नाचा पाठलाग करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले.
खरं तर, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, प्रियांका चोप्रा (priyanka chopra) तिच्या कारकिर्दीत आलेल्या अडचणीबद्दल बोलली आणि हिंदी चित्रपट उद्योग अधिक न्याय्य स्थान कसे बनू शकते यावर तिचे विचार मांडले. अभिनेत्रीने कबूल केले की, जेव्हा गोष्टी याेजनेनुसार घडत नव्हत्या तेव्हा ती घाबरायची आणि स्वत:ला कमजाेर समजायची. तिच्या प्रवासाचे वर्णन करताना, ती म्हणाला की, ‘तिने काही मित्र आणि काही उत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले आहे.’
अभिनेत्री म्हणाली की, ‘तिने गाेंगाट कमी करण्याचा प्रयत्न केला आणि पुढचे पाऊल उचलण्यावर लक्ष केंद्रित केले. ती कुठे चाललीय हे माहीत नसतानाही प्रियांकाने अवघ्या वयाच्या 20व्या वर्षात एका डार्क फेजमधून जात असल्याबद्दलही सांगितले.’
याआधी अभिनेत्रीने बॉलिवूडमधील राजकारण आणि भेदभावाबाबत खुलासा केला होता. या कारणांमुळे तिने हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले होते. हॉलिवूडमध्ये गेल्यावर, अभिनेत्री म्हणाली की, ‘ही एक किंवा दोन लोकांची चूक नाही तर मोठ्या समाजाची आहे, ज्याने हे वर्तन कायम ठेवले.’ ती म्हणाले की, ‘प्रत्येकजण इतरांसाठी संधी आणि जागा कशी निर्माण करतो याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.’
View this post on Instagram
प्रियांका चाेप्राे सिटाडेलनंतर बाॅलिवूड चित्रपटांमध्ये परतणार आहे. प्रियांका पुढे फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.(bollywood actress priyanka chopra talk about her dark phase and being terrified actress reveal how she feel about it )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
KKBKKJ | चित्रपट रिलीज होण्यापूर्वी सलमानचा आयेशा श्रॉफसाेबतचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; युजर्स म्हणाले, ‘पहिलेपासून शर्टलेस…’
“…एकदा गमावल्यानंतर पुन्हा…” रोनित रॉयने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टवर स्मृती इराणींनी कमेंट करत विचारले…