Wednesday, July 3, 2024

चोली के पीछे क्या है? सोशल मीडियावर राखी सावंतच्या व्हिडिओने केला राडा

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही मनोरंजनाचा फुल धमाका आहे. जिथे कुठे जाईल तिथे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी ती सोडत नाही. म्हणूनच की काय तिला बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन असे संबोधतात. आजकाल तर ती नेहमीच रस्त्यावर, कॉफी शॉपमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात स्पॉट होत असते. ती दिसताच प्रेक्षक तसेच पॅपराजी आपसूकच तिच्याकडे आकर्षित होतात. यासोबतच राखी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि मजेशीर व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. आता देखील राखीने सोशल मीडियावर एक असा धमाका केला आहे की, जो पाहून सगळेच हसून लोटपोट होतील. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे.

राखीने हा व्हिडिओ अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, राखी सावंत गोरिलाच्या गेटअपमध्ये डान्स करताना दिसत आहे. ती ज्या स्टाईलने डान्स करत आहे, तसे केवळ राखीच करू शकते. तिने यावर पिवळ्या रंगाची एक ओढणी घेतलेली दिसत आहे. ती ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर ठुमके मारताना दिसत आहे. (Bollywood actress rakhi sawant dance in gorilla get up shares funny video )

तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. अनेक कलाकार देखील तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहे. या व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने “लव्ह यू क्वीन” अशी कमेंट केली आहे, तर टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य हिने स्माईल ईमोजी पोस्ट केली आहे.

राखी सावंतचा या निराळ्या अंदाजाला तिचे चाहते खूप प्रतिसाद देत आहे. लोकांना हा लूक खूप आवडला आहे. राखी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मागच्या वर्षी ती ‘बिग बॉस १४’ मध्ये दिसली होती. नुकतेच ‘बिग बॉस १५’ मध्ये देखील तिची झलक पाहायला मिळाली होती. तसेच तिने अनेक आयटम साँगवर डान्स करून लोकप्रियता मिळवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा