Sunday, October 19, 2025
Home अन्य रकुल प्रीत सिंगने स्विम सूट घालून -15 डिग्री सेल्सिअस पाण्यात मारली उडी; चाहते म्हणले, ‘आग लावली’

रकुल प्रीत सिंगने स्विम सूट घालून -15 डिग्री सेल्सिअस पाण्यात मारली उडी; चाहते म्हणले, ‘आग लावली’

बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती क्रायोथेरपी सेशन घेताना दिसत आहे. रकुल बर्फाने वेढलेल्या दऱ्यांमध्ये आहे आणि पाण्यात डुंबताना दिसते. यावेळी तिने कलरफुल बिकिनी घातली आहे, ज्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओला 24 तासात 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याच वेळी, व्हिडिओवर 2700 कमेंट्स आल्या आहेत.

व्हिडिओ शेअर करताना रकुल प्रीत सिंग (rakul preet singh) हिने लिहिले, “-15 डिग्रीमध्ये क्रायो.. कुणाला करायचा आहे?” व्हिडिओची सुरुवात बर्फाळ पर्वत दाखवून होते. यानंतर रकुल तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे. यावेळी तिने कोट आणि विंटर वियर घातला आहे. यानंतर ती लाकडापासून बनवलेल्या केबिनमध्ये जाते. तेथून घामाने भिजत बाहेर येते अन् थेट पाण्यात उतरते. तिच्या सभोवतालचे तापमान -15 अंश सेल्सिअस आहे. या कठीण काळातही तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. यानंतर ती पाण्यातून बाहेर येते आणि लगेच केबिनमध्ये परतते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुल प्रीतच्या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, “ती खूप हॉट असल्याचा हा पुरावा आहे.”, तर एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “रकुलने पाण्याला आग लावली आहे.” अशात एका युजरने लिहिले, “तुम्ही कोणत्या चित्रपटासाठी शुट करत आहात?”

रकुल प्रीत सिंग शेवटची ‘छत्रीवाली’ चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिने कंडोम विक्रेत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या मुलाखतीदरम्यान, जेव्हा तिला चित्रपटाच्या टाइटलबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, ‘तुम्हाला माहित आहे की, कंडोम कोणत्या नावाने ओळखले जाते. यामध्ये ‘हेल्मेट’, ‘छत्री’, ‘रेनकोट’ अशा नावांचा समावेश आहे. चित्रपटाचे नावही तिथूनच घेतल्या गेले. ती एका छत्री कंपनीत काम करते. म्हणूनच तिला छत्रीवाली म्हणतात. छत्रीवालीमध्ये काहीही वाईट नाही. ही सर्व मनाची बाब आहे.”

रकुल प्रीत सिंगच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘दे दे प्यार दे’, ‘छत्री वाली’, ‘डाॅक्टर जी ‘, ‘थॅंक गाॅड’ या सारखी दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिली आहे. (bollywood actress rakul preet singh dip in minus 15 degree celsius water wearing a colorful swimsuit fans reaction goes viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चिंतेमुळे 125 किलो वाढलं वजन अन् श्वास घेण्यास हाेत हाेता त्रास; पारस छाबराचा माेठा खुलासा, म्हणाला…

प्रतीक्षा संपली! धमाल कॉमेडी चित्रपट सासूबाई जोरात ‘या’ तारखेला हाेणार सिनेमागृहात प्रदर्शित

हे देखील वाचा