Friday, April 19, 2024

डिमांड तर बघा! रकुल प्रीत सिंगला करायचे आहे रोमँटिक सिनेमात काम, शाहरुख खानला मानते आदर्श

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (rakul preet singh) गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘थँक गॉड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण आणि रकुल प्रीत एकदा ‘थँक गॉड’मध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. दरम्यान, रकुल प्रीत सिंगचे नवीन व्हिडिओ गाणे ‘मेहबूबा’ देखील रिलीज झाले आहे. रकुल प्रीतने तिच्या मेहनतीमुळे साऊथ ते बॉलिवूड हा प्रवास गाठला आहे. ‘रनवे ३४’ ‘यारियां’, ‘दे दे प्यार दे’, ‘अटॅक’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या रकुलला आता बायोपिक आणि रोमँटिक चित्रपटांमध्ये काम करायचे आहे.

एका मुलाखतीदरम्यान रकुल प्रीतने तिची इच्छा व्यक्त केली होती आणि सांगितले होते की, तिला बायोपिकमध्ये काम करायचे आहे, फक्त एक चांगली कथा असावी. याशिवाय तिने पुढे सांगितले की, तिला शाहरुख खानचा ‘डीडीएलजे’, शाहिद कपूर, करीना कपूरचा ‘जब वी मेट’, रणबीर-दीपिकाचा ‘ये जवानी है दिवानी’ यासारख्या शुद्ध रोमँटिक सिनेमांमध्ये काम करायचे आहे.

कामाच्या आघाडीवर, रकुलकडे दोन बॅक टू बॅक चित्रपट आहेत. रकुल प्रीत सिंग लवकरच ‘डॉक्टर जी’ चित्रपटात दिसणार आहे. रकुल प्रीत सिंह ‘डॉक्टर जी’मध्ये अभिनेता आयुष्मान खुरानासोबत (ayushaman khurana) रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय इंद्र कुमार दिग्दर्शित अजय देवगण (ajay devgan) आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​(siddharth malhotra) यांच्या थँक गॉड या चित्रपटातही रकुल प्रीत दिसणार आहे.

रकुल प्रीत सिंगने ‘यारियां’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. रकुल ‘यारियां’मध्ये अभिनेता हिमांश कोहलीसोबत (himanshu kohali) दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

वाढदिवसाचे औचित्य साधून रकुलप्रीत सिंगने केला ‘या’ निर्मात्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा

अब्दू रोजिकने सांगितले त्याच्या शाळेतील वाईट अनुभव, कमी उंचीमुळे शाळेतून काढले होते बाहेर

हे देखील वाचा