Saturday, June 29, 2024

रश्मिका मंदान्नाचे इंस्टाग्राम अकाउंट झाले हॅक? इंस्टा बायाे पाहून चाहते चिंतेत

दक्षिण आणि बॉलिवूड चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यावर्षी, अभिनेत्रीने ‘गुड बाय’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले. दाक्षिणात्य चाहत्यांसोबतच आता तिला बॉलिवूडच्या चाहत्यांकडूनही भरभरून प्रेम मिळत आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या फॅन फॉलोइंगचा अंदाज लावता येतो. अभिनेत्रीचे 35.5 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान, आता अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची बातमी समोर येत आहे.

खरं तर, जर तुम्ही अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika mandanna) हिच्या अकाउंटवर पाहिले असेल, तर बायोमध्ये तिचे नाव उलटे दिसत आहे. हे पाहून तिचे अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. अभिनेत्रीचे चाहते कमेंट करून चिंता व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत, अभिनेत्रीचे अकाऊंट हॅक झाले नसून तिने स्वतः ते बदलले आहे, याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

rashmika_mandanna
Photo Courtesy: Instagram/rashmika_mandanna

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आणि उघड केले की, हे सर्व प्लम प्रोजेक्ट ब्लॅकबोर्ड नावाच्या मोहिमेचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश मुलींच्या शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे आहे. उलट क्रमाने तिचे नाव दर्शविणारा तिच्या बायोचा स्क्रीनशॉट शेअर करत, रश्मिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टाेरीवर लिहिले, “लहान मुलींना कसे वाचावे हे माहित नसते तेव्हा त्यांना असे वाटते. चांगुलपणा ते बदलण्याच्या मिशनवर आहे.”

या व्हिडिओनंतर, काही तासांपूर्वी, अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपट मिशन मजनूचे पोस्टर देखील रिलीज केले आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​एजंटच्या भूमिकेत दिसत आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. रश्मिकाचा ‘मिशन मजनू’ यावर्षी 20 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. मात्र, हा चित्रपट पडद्यावर प्रदर्शित होणार नसून OTT वर प्रदर्शित होणार आहे. मिशन मजनू व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना बद्दल सांगायचे झाले तर, तिचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. (bollywood actre`s`s rashmika mandanna instagram account hacked this change in name)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काळ्या रंगावरून नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य; रिंकू राजगुरूचं नाव घेत म्हणाला, ‘गोरी नसूनही…’

उर्फी पुन्हा चर्चेत! कारण ठरलं पोलीस तक्रार; राग व्यक्त करत म्हणाली, ‘माझ्यावर लैंगिक…’

हे देखील वाचा