Friday, March 29, 2024

फटाके वाजवा रे! रश्मिका मंदान्ना अन् विजय देवरकोंडा अडकले विवाह बंधनात?

दक्षिणेतील अभिनेता विजय देवरकोंडा व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतो. लाखो मुली या अभिनेत्यासाठी वेड्या आहेत, पण विजय देवरकोंडाचे नाव रश्मिका मंदान्ना हिच्यासाेबत जोडले गेले आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, रश्मिका आणि विजय यांनी नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे. पण आता रश्मिका आणि विजयचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे वधू आणि वर म्हणून पोज देत आहेत. ज्यामुळे दाेघेही चांगलेच चर्चेत आले आहे.

रश्मिका मंदान्ना ( rashmika mandanna) आणि विजय देवरकोंडा (vijay deverakonda ) यांच्या अफेअरच्या अफवांदरम्यान, दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या गळ्यात हार घालताना दिसत आहेत. यादरम्यान रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. फाेटाे पाहून दोघेही त्यांच्या लग्नावर खूप खूश असल्याचे दिसून येत आहे. विजय देवराकोंडा पांढऱ्या शेरवानी आणि पगडीमध्ये डॅशिंग दिसत आहे तर रश्मिका सोनेरी रंगाच्या पोशाखात आहे. दोघांच्या या फोटोमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

मात्र, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या या फाेटाेत तथ्य नाही. हा फोटो दोघांच्या फॅन पेजने सोशल मीडियावर शेअर केला असून हे फाेटाे नीट पाहिल्यास एका चाहत्याने मॉर्फ केले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

विजय देवराकाेंड याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विजय देवरकोंडा शेवटचा ‘लिगर’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे दिसली होती. हा चित्रपट करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तयार करण्यात आला होता, पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाई करु शकला नाही आणि फ्लॉप झाला. त्याचबरोबर रश्मिकाने ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (actor vijay deverakonda and actress rashmika mandanna wedding photo viral on internet know the truth)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! प्रसिद्ध मराठी अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत प्रचंड खालावली, रुग्णालयात उपचार सुरु

सुरभी चंदना सिंपल ग्लॅमरस लूक चाहत्यांना करतोय घायाळ, एकदा पाहाच फोटो

हे देखील वाचा