Saturday, June 29, 2024

वाढदिवस विशेष: ६४ वर्षांच्या झाल्या रत्ना पाठक, रंजक आहे नसीरुद्दीन शाहसोबत त्यांची लव्हस्टोरी!

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या मुलांनी या इंडस्ट्रीमध्ये यायचे ठरवले आणि नावही कमावले. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रत्ना पाठक, ज्यांची आई दीना पाठक बॉलिवूडच्या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

गुरुवारी अभिनेत्री रत्ना पाठक आपला 64 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. चित्रपट कारकीर्दीत एकापेक्षा एक संस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे रत्ना पाठक. विनोदी पात्र असो किंवा गंभीर भूमिका असो, त्यांनी ती उत्तमरीत्या साकारली.

रत्ना यांचा जन्म 18 मार्च 1957 रोजी मुंबईत झाला. चित्रपट नगरीमध्ये जन्मलेल्या रत्नाही फिल्मी कुटुंबातल्या होत्या. रत्ना पाठक प्रसिद्ध अभिनेत्री दीना पाठक यांच्या कन्या, तर सुप्रिया पाठक त्यांची बहीण आहे. इतकेच नाही तर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्याशी लग्न केले आहे. या दोघांची प्रेमकथा खूपच रंजक आहे.

रत्ना नसीरुद्दीन साहेबांपेक्षा 13 वर्षांनी लहान आहेत. 1975 मध्ये रत्ना आणि नसीर साहेब याची अभ्यासादरम्यान भेट झाली होती. एका नाटकाच्या संदर्भात दोघे पहिल्यांदा भेटले. सत्यदेव दुबे यांच्या दिग्दर्शनाखाली एक नाटक होणार होते, ज्याचे नाव ‘संभोग से संन्यास तक’ असे होते. या नाटकांत दोघांनी एकमेकांना पाहिले.

जेव्हा रत्ना नसीर साहेबांना भेटल्या, तेव्हा त्यांचे लग्न परवीन मुरादशी झाले होते. परवीन पाकिस्तानी होत्या व त्या नसीर साहेबांपेक्षा 16 वर्षाने मोठ्या होत्या. नसीर आणि परवीनला हीबा शाह नावाची एक मुलगीही आहे. काही दिवसांनंतर हे दोघे वेगळे झाले व परवीन आपल्या मुलीसह इराणला गेल्या. काही काळानंतर मुलगी हीबा शाह भारतात परतली आणि नसिर यांच्याबरोबर राहू लागली. मग रत्ना आणि नसिर यांनी मुले इमाद आणि विवानसोबतच तिचे संगोपन केले.

रत्ना पाठक शहा यांनी ‘मंडी’, ‘मिर्च मसाला’, ‘अलादीन’, ‘जाने तू या जाने ना’, ‘गोलमाल 3’, ‘एक मैं और एक तू’, ‘खूबसुरत’ अशा अनेक हिट चित्रपट केले. 2017 मध्ये आलेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठीही नामांकन मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-साठच्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’, ज्याचे संपूर्ण कुटुंब होते चित्रपट उद्योगात

-तबला वादनासोबतच चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे उस्ताद ‘झाकीर हुसेन’

-श्रीदेवीशी केले गुप्तपणे लग्न, एकेकाळी होता नक्षलवादाशी संबंध; वाचा मिथुन चक्रवर्तींचे न ऐकलेले किस्से

हे देखील वाचा