74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी देशातील सर्वोच्च पुरस्कारांसाठी 106 जणांची निवड करण्यात आली, ज्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीत बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रवीना टंडनच्या नावाचाही समावेश आहे. रवीना टंडनला साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
रवीना टंडन ( raveena tandon) हे भारतीय चित्रपटसृष्टीतील असे एक नाव आहे, जिने 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि ग्लॅमरने सिनेविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली. रवीना टंडनने मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. रवीना टंडनने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिची आणि सल्लू मियाँची जोडी खूपच गाजली हाेती.
‘पत्थर के फूल’मध्ये काम केल्यानंतर रवीना टंडनने एकापेक्षा एक चित्रपटात काम केले. आपल्या 32 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये रवीनाने जवळपास 64 सिनेमांमध्ये काम केले आहे. यामध्ये तिने ‘दिलवाले’, ‘मोहरा’, ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘जिद्दी’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ यांसह अनेक यशस्वी विनोदी चित्रपटांमध्ये काम केले. यासोबतच रवीना टंडनने ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘मोहरा’ आणि ‘शूल’ सारख्या क्राइम थ्रिलर चित्रपटातही काम केले. ‘टिप टिप बरसा पानी’, ‘शेहर की लडकी’, ‘चुरा के दिल मेरा’ आणि ‘आंखियों से गोली मारे’ यांसारखी रवीना टंडनची अनेक गाणी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
अलीकडेच रवीना टंडन दक्षिण भारतीय चित्रपट ‘KGF Chapter 2’ मध्ये दिसली होती. या चित्रपटातील रवीनाच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर रवीना टंडनने 2004 मध्ये अनिल थडानीसोबत लग्न केले. रवीना दोन मुलांची आई आहे. (bollywood actress raveena tandon gets padma shree awards 2023 announced by president murmu in filed of cinema on republic day)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर
VIDEO: अजय देवगनला भर कार्यक्रमात खेचत तब्बूने केलं किस, सोशल मीडियावर व्हिडिओचा कहर