Saturday, July 6, 2024

रवीना टंडनची खतरनाक स्टाईल! पत्नीला चुकीच्या नावाने हाक मारणाऱ्या नवऱ्यांना इशारा

बाॅलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नियमित तिचे व्हिडिओ-रील आणि फाेटाे शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करते. अशातच रवीनाने एक लेटेस्ट रील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती अतिशय भीतीदायक पद्धतीने सांगत आहे की, तिने आपल्या पतीला का मारले? यापूर्वी हत्येचा पार्ट वन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘मस्त मस्त गर्ल’चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया.

रवीना टंडन (raveena tandon) हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या रीलमध्ये ती डोक्यावर पांढरा स्कार्फ घेऊन एक्सप्रेशन देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पोलिस तिची चौकशी करत असून ती प्रश्नाची उत्तर देत आहे. समाेरून कोणाचा तरी आवाज येतो की, “तुझ्या नवऱ्याचे शेवटचे शब्द काय होते.” अभिनेत्री उत्तरात म्हणते की, “तो म्हणाला की, माझा चष्मा कुठे आहे संगीता?”, यावर अभिनेत्रीला विचारले जाते की, “त्याला मारण्याचे काय कारण हाेत?” उत्तरात रवीना सांगते, “माझे नाव रंजना आहे.”

रवीना टंडनच्या या फनी रीलवर चाहते पाेटधरून हसत आहेत. चाहते रवीनाच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत आणि ‘मास्टपीस’ म्हणत आहेत. या व्हिडिओवर एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, “उडी बाबा नाव घेतल्यावर संपला.” तर एकाने लिहिले, “काय अभिनय आहे रंजना”, लोक याला मजेदार मीम्स म्हणत सर्वोत्तम परफॉर्मन्स देखील म्हणत आहेत. तर अनेकजण ‘हाहाहाहाहा’ लिहित आहेत.

रवीना टंडनच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर ती शेवटची ‘KGF: Chapter 2’ मध्ये दिसली होती. याशिवाय ती संजय दत्तसोबत ‘घुडछडी’मध्ये दिसणार आहे. सध्या रवीना अरबाज खानसोबत ‘पटना शुक्ला’ आणि ‘आरण्यक’ वेब शोमध्ये काम करत आहेत.(bollywood actre`s`s raveena tandon hilarious video viral internet actress warns husband beware )

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध हॉलिवूड गायिका लिसा प्रेस्ली यांचे वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी निधन
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच लेकीसोबत झाले स्पॉट, आई कुशीत झोपलेली दिसली राहा

हे देखील वाचा