Sunday, May 19, 2024

प्रसिद्ध हॉलिवूड गायिका लिसा प्रेस्ली यांचे वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी निधन

प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार लिसा मेरी प्रेस्ली यांचे दुःखद निधन झाले आहे. व्हायच्या अवघ्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार मिस लिसा यांना अत्यवस्थ वाटत असल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. लिसा मेरी प्रेस्ली या दिवंगत अमेरिकन अभिनेते, गायक आणि संगीतकार एल्विस प्रेस्ली यांच्या कन्या होत्या.

एल्विस प्रेस्ली यांना लिसा या एकमेव अपत्य होते. लिसा यांच्या या अशा आकस्मिक निधनामुळे त्यांचे कुटुंब दुःखात असून, त्याच्या निधनाचा मोठा धक्का सर्वांना बसला आहे. लिसा यांच्या चाहत्यांना देखील या बातमीमुळे धक्का बसला असून, अनेकांना यावर विश्वास बसत नसल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे. लिसा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाकडून एक संदेश जरी केला आहे. त्यात सांगितले आहे की, ‘या दुःखाच्या काळात आमच्यासोबत उभे राहण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी धन्यवाद. या दुःखाच्या काळात आमच्या कुटुंबाच्या खासगी आयुष्याचा मान ठेवा.” अशी विनंती देखील केली गेली आहे.

प्राप्त माहितीनुसार प्रेस्ली यांना हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच प्रेस्ली यांनी त्यांच्या आईसोबत गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या समारंभात सहभाग घेतला होता. लिसा यांच्या आई प्रिसिला प्रेस्ली यादेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. लिसा या पाच वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. वयाच्या नवव्या वर्षी अर्थात १९७७ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लिसा मेरी प्रेस्ली यांचा पहिला म्युझिक अल्बम २००३ साली आला होता. लिसा प्रेस्ली यांचे लग्न दिवंगत पॉप स्टार गायक मायकल जॅक्सनसोबत झाले होते. मात्र त्यांच्यात पुढे घटस्फोट झाला. या दोघांनी १९९४ साली लग्न केले आणि केवळ दोन वर्षातच १९९६ साली घटस्फोट घेतला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सतत ड्रेस सावरताना दिसली भोजपुरी स्टार आम्रपाली दुबे
हसरा चेहरा इतिहास गेहरा! गौरी नलावडेचा शाइनी लूक

 

हे देखील वाचा