बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याने त्याच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. काही दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की, इब्राहिम लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशात आता या वृत्ताला इब्राहिमची बहीण सारा अली खान हिने दुजोरा दिला आहे. इब्राहिम लवकरच अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करणार आहे, असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
माध्यमाना दिलेल्या मुलाखतीदरम्यान सारा अली खान (sara ali khan) म्हणाली, ‘इब्राहिमने अभिनेता म्हणून त्याच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, ज्यावर माझा विश्वास बसत नाही.’ याशिवाय साराने सांगितले की,’ तिचे हृदय अगदी तिची आई अमृता सिंह यांच्यासारखे आहे.’ दोघेही इब्राहिम अली खानवर खूप प्रेम करतात.
View this post on Instagram
यापूर्वी अनेक रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की, करण जोहर इब्राहिम अली खानला लॉन्च करणार आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर इब्राहिमने करण जोहरला ‘रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी’साठी असिस्ट केले आहे.
सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगची मुले आहेत. सैफ आणि अमृता 2004मध्ये विभक्त झाले. यानंतर दोन्ही मुले अमृता सिंगसोबत राहू लागले. सारा अली खानने 2018मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पदार्पण केले आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
View this post on Instagram
सारा अली खान आजकाल तिचा नवीन चित्रपट ‘जरा हटके जरा बचके’च्या रिलीजची वाट पाहत आहे. यामध्ये तिच्यासाेबत विकी कौशलही स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट 2 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.(bollywood actress sara ali khan on ibrahim ali khan bollywood debut says she cant believe he has wrapped up filming for his first movie)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थ जाधवने लेकीसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, “…तेव्हा बापाचा आनंद Calm Down”
मुंबईतील वांद्रे येथे सलमान खान बांधणार 19मजली हॉटेल, ‘या’ सुविधांनी सुसज्ज असेल इमारत